
वस्तुसंग्रहालयांकडे पर्यटकांचा ओढा!
कोल्हापूर - मातीची भांडी, मणी, दागिन्यांसह जुन्या दगडी व धातूच्या शास्त्राचे आकर्षक कमी झालेले नाही. वस्तुसंग्रहालयात त्यांचे संरक्षण व संवर्धन केले जाते. या वस्तू पाहण्याची उत्सुकता असल्याने आजही शहरातील वस्तुसंग्रहालयांत पर्यटकांचा ओघ कायम आहे. टाऊन हॉल बागेतील वस्तुसंग्रहालयात प्राचीन कोल्हापूरचा जावा, सुमात्रा बेटांशी व्यापार चालत होता. त्याचे पुरावे ब्रह्मपुरी टेकडीच्या उत्खननात मिळालेले आहेत. समुद्र देवतेची मूर्ती, मातीची भांडी, मणी त्यात सापडले होते. ते वस्तुसंग्रहालयात मांडले आहेत.
ऐतिहासिक शास्त्रांमध्ये तलवार, ढाल, सांग, विटा, कट्यार जांबीया यांचे महत्त्व कमी झालेले नाही. युद्धकला प्रशिक्षणात ही शस्त्रे चालविण्याचे प्रशिक्षण दिले जात आहे. या कलेला ऊर्जितावस्था मिळत असल्याने नव्या पिढीची पावले वस्तुसंग्रहालयाकडे वळत आहेत. न्यू पॅलेसमध्ये शस्त्रांचे संग्रहालय असून, तेथे शस्त्रांचे विविध प्रकार पाहायला मिळतात. त्याचबरोबर शिकार केलेल्या प्राण्यांची कातडे, बंदुका, पगड्यांसह चिलखत, पट्टा, अंकुश, गुर्जही येथे आहे. विशेष म्हणजे उन्हाळी व हिवाळी सुटीच्या काळात पर्यटकांच्या गर्दीने संग्रहालये फुलून जातात.
कोरोनामुळे दोन वर्षे वस्तुसंग्रहालये बंद होती. आता कोरोनानंतर पुन्हा संग्रहालयांचे दरवाजे उघडले आहेत. पर्यटकांची गर्दी संग्रहालयात दिसत आहे. विशेष म्हणजे ज्येष्ठ शास्त्रज्ञ संग्राहक (कै.) गिरीश जाधव यांनी वैयक्तिकरीत्या सुमारे पंधराशे शस्त्रे संग्रहित केली. महाराष्ट्रातील सर्वसामान्यांना शास्त्रांची माहिती कळावी, यासाठी त्यांनी त्याची राज्यभरात प्रदर्शने भरवली. त्यांच्या पावलावर पाऊल ठेवत आज महाराष्ट्रात अनेक जण क्षेत्र संग्रह करत आहेत. शस्त्रांचे जतन, संरक्षण व संवर्धनासाठी प्रयत्न करत आहेत.
Web Title: Tourists Flock To The Museums For See Antiques
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..