
पाकिस्तानच्या समर्थनार्थ मुचंडी येथे घोषणाबाजी
जत : मुचंडी येथील एका बारमध्ये मद्याच्या नशेत एकाने पाकिस्तान जिंदाबादच्या घोषणा दिल्याने केल्याने खळबळ उडाली. पोलिसांनी हाजीमलंग नबीसाहब नदाफ (मुचंडी, ता. जत) याच्या विरोधात १५३ अ अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. मंगळवारी रात्री ९.३० च्या सुमारास ही घटना घडली. याबाबत राजकुमार महादेव कोळी (मुचंडी, ता. जत) यांनी जत पोलिस ठाण्यात फिर्याद दिली असून नोंद झाली आहे.
पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, राजकुमार कोळी, हाजीमलंग नदाफसह पाच ते सहा जण मुचंडी येथील एका बारमध्ये मद्य प्राशन करत होते. फिर्यादी राजकुमार मोबाईल बघत होता. मोबाईलवरील माहिती पाहून त्याने ‘जय श्रीराम’च्या घोषणा दिल्या. त्याच ठिकाणी हाजीमलंग नदाफनेही मद्याच्या नशेत पाकिस्तान जिंदाबादच्या घोषणा दिल्या. तेव्हा राजकुमारने नदाफला याबाबत जाब विचारला. दोघांमध्ये मारहाणीचाही प्रकार घडला.
फिर्यादी राजकुमार कोळी यांनी रात्री उशिरा जत पोलिस ठाण्यात धाव घेतली. आज बुधवारी दुपारी पोलिसांनी हाजीमलंग नदाफविरोधात गुन्हा दाखल केला आहे. सहायक पोलिस निरीक्षक महेश मोहिते अधिक तपास तपास करत आहेत. दरम्यान, नदाफनेही तक्रार दिली आहे. मुचंडी येथील घडलेला प्रकार मद्याच्या नशेत व चेष्टा- मस्करीत घडला. त्याला मारहाण केल्याचे तक्रारीत म्हटले आहे. याप्रकरणी राजकुमार कोळी (मुचंडी, ता. जत) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Web Title: Treason Case Slogan At Muchandi In Support Of Pakistan Jat Police Station
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..