गोव्याहून महाराष्ट्रात येणाऱ्या प्रत्येक वाहनाची तपासणी केली जाते. कुटुंबासह असणाऱ्यांनाही यातून सुटका दिली जात नाही. मात्र, मोटारीतून मद्याचे ३६ बॉक्स नेणाऱ्या संशयित ढेरे याला तपासणी नाक्यावर कोणीच अडवले नाही, याचे आश्चर्य आहे.
कोल्हापूर : अधिकाऱ्याची मोटार असल्याचे भासवून चक्क लाल दिव्याच्या वाहनातून गोवा बनावटीच्या दारूची तस्करी करण्याचा प्रकार समोर आला. राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या (State Excise Department) भरारी पथकाने महागाव येथे कारवाई करत तोतया अबकारी पोलिस (Excise Police) नितीन दिलीप ढेरे (वय ३३, रा. जाधववाडी, मार्केटयार्ड) व सेवानिवृत्त लष्करी जवान शिवाजी आनंदा धायगुडे (५७, रा. अंदोरी, खंडाळा, सातारा) यांना अटक केली. त्यांच्याकडून पंचवीस लाखांच्या दोन मोटारींसह अडीच लाखांची दारू जप्त करण्यात आली आहे.