Kolhapur News : खेकडे पकडायला गेले अन प्राणाला मुकले; राक्षीतील सख्याभावांचा करंट लागून दुर्दैवी अंत

पन्हाळा पोलिसांना तपासा यश मिळाले.त्यांनी पाच संशयितांना ताब्यात घेतले आहे. घटनास्थळी बघ्यांनी गर्दी केली आहे.
two youth went to catch crabs and lost life electric current kolhapur police
two youth went to catch crabs and lost life electric current kolhapur policeSakal

कोल्हापूर : पन्हाळा तालुक्यातील राक्षी येथील खेकडे पकडण्यासाठी गेलेल्या दोन सख्याभावांचा शिकार करणाऱ्यांनी लावलेल्या विद्युत तारेचा करंट लागून मृत्यू झाल्याचा प्राथमिक अंदाज असुन मृतदेह राक्षी जवळच असणाऱ्या वाघजाई देवी मंदिर च्या मागील जंगलात सापडले. पन्हाळा पोलिसांना तपासा यश मिळाले.त्यांनी पाच संशयितांना ताब्यात घेतले आहे. घटनास्थळी बघ्यांनी गर्दी केली आहे.

राक्षी ता.पन्हाळा येथील ८ तारखेला खेकडे पकडायला जातो असे सांगून घरातून गेलेले जोतिराम सदाशिव कुंभार वय वर्ष ६४ व नायकू सदाशिव कुंभार वय वर्ष ६० हे दोन सख्खे भाऊ बेपत्ताझाले होते. याबाबत दिलेल्या फिर्यादीवरून पन्हाळा पोलिसांबरोबर स्थानिक गुन्हे आनवेशन शाखा तपास घेत होते.

पण पाच दिवस झाले तरी त्यांना तपासात यश मिळत नव्हते. म्हणून उपविभागीय पोलीस अधिकारी शाहूवाडी विभाग जयकुमार सूर्यवंशी यांच्या मार्गदर्शना खाली तपासाची दिशा बदलत लावलेल्या विद्युत तारेचा करंट लागला असेल का याचा तपास घेणेस चालू केले. यात पन्हाळा पोलिसांना यश मिळाले. व एन दीपावलीचे रात्री अशेचा किरण दिसला.सोमवारी सकाळी राक्षितीलच एक शिकाऱ्याला ताब्यात घेत चौकशी केली असता संपूर्ण गुन्ह्यांचीच उकल झाली.

त्याने दिलेल्या माहिती नुसार पन्हाळा पोलिसांनी मृतदेह टाकलेल्या ठिकाणाला भेट दिली असता तेथे सडलेल्या अवस्थेतील मृतदेह मिळून आहे. या गुन्हात पाच जणांना पोलिसांनी संशयित म्हणून ताब्यात घेतले आहे.याची माहिती मिळताच अपर पोलीस अधीक्षक कोल्हापूर जयश्री देसाई यांनी घटना स्थळी दाखला होत मार्गदर्शन केले.तर पन्हाळा तहसीलदार माधवी शिंदे जाधव यांनी घटनास्थळाला भेट देत माहिती घेतली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com