Untimely rains hit homes in kolhapur
Untimely rains hit homes in kolhapur

अवकाळी पावसाचा गुर्‍हाळघरांना फटका 

वडणगे - जिल्ह्यात काल (सोमवार)  आणि आज सकाळी झालेल्या अवकाळी पावसामुळे शेती कामाचे नियोजन कोलमडले आहे. या पावसाचा सर्वाधिक फटका गुर्‍हाळघरांना बसला असून त्यांची धुरांडी थंडावली आहेत. साखर हंगाम सुरू होवून दोन महिने होत नाहीत तोपर्यतच अवकाळी बरसल्याने ऊसतोडीही थांबल्या आहेत.

 जिह्याची अर्थवाहिनी मानल्या जाणार्‍या गूळ व साखर व्यवसायावर अवकाळीमुळे अवकळा पसरली आहे. पावसामुळे ऊस तोडता येत नाही तोडला तर शेतात चिखल असल्याने वाहतूक करता येत नाही. शेतात चिखल असल्याने रस्त्याकडील ऊसाकडे आता कारखान्यांचे  लक्ष असणार आहे.


 गुर्‍हाळघरांवरही अवकाळी पावसाचा परिणाम झाला आहे.  गुर्‍हाळघरासाठी लागणारे जळण पूर्णपणे भिजल्याने गुर्‍हाळमालक हतबल झाले आहेत. जळण नसल्याने गुर्‍हाळ काही दिवस बंद ठेवावी लागणार आहेत. अनेक गुर्‍हाळघरांवर गाळपासाठी आणलेला ऊस पडून आहे. दिवाळींनंतर जिल्हयातील गुर्‍हाळघरांनी गती घेतली होती. मात्र अवकाळीमुळं गुर्‍हाळघरांना झटका बसला आहे. आधीच गुळाला दर नाही, मजुरांमुळे हैराण झालेले गुर्‍हाळ मालक अधिकच त्रस्त  झाले आहेत.

 पावसामुळे गुर्‍हाळघरे किमान चार पाच दिवस बंद ठेवावी लागणार आहेत. आधीच गुळाला दर नसताना हंगाम कसा पूर्ण करायचा असा प्रश्‍न आहे. त्यात अवकाळी पावसाने नुकसानीत भर घातली आहे. खराब हवामानामुळे गाळप केलेल्या गुळाला पाणी सुटण्याची भीती आहे.

जयदीप पाटील, गुर्‍हाळमालक, वडणगे

 
संपादन - धनाजी सुर्वे 

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com