esakal | गव्यांना हुसकविण्यासाठी शेतात रात्रभर रेडीओचा वापर 
sakal

बोलून बातमी शोधा

The Use Of Overnight Radios In The Agriculchar Farm In Uttur Area Kolhapur Marathi News

गव्यांच्या उपद्रवाने बेलेवाडी हूबळगी येथील शेतकरी हैराण झाले आहेत. भावेश्‍वरी मंदिर परिसरातील सुमारे पंचवीस एकर क्षेत्रात गव्यांनी अक्षरश: धुडघुस घातला आहे. चांगली उगवण झालेली पिके गव्यांकडून फस्त होवू लागली आहेत. गव्यांना हुसकाण्यासाठी शेतकरी रात्रभर शेतात रेडिओवर गाणी सुरू ठेवत आहेत. जोरजोराच्या हाके आणि फटाक्‍यांचा वापर करत आहेत. या उपायांनाही गवे बदत नसल्याने शेतकरी त्रस्त आहेत. 

गव्यांना हुसकविण्यासाठी शेतात रात्रभर रेडीओचा वापर 

sakal_logo
By
अशोक तोरस्कर

उत्तूर : गव्यांच्या उपद्रवाने बेलेवाडी हूबळगी येथील शेतकरी हैराण झाले आहेत. भावेश्‍वरी मंदिर परिसरातील सुमारे पंचवीस एकर क्षेत्रात गव्यांनी अक्षरश: धुडघुस घातला आहे. चांगली उगवण झालेली पिके गव्यांकडून फस्त होवू लागली आहेत. गव्यांना हुसकाण्यासाठी शेतकरी रात्रभर शेतात रेडिओवर गाणी सुरू ठेवत आहेत. जोरजोराच्या हाके आणि फटाक्‍यांचा वापर करत आहेत. या उपायांनाही गवे बदत नसल्याने शेतकरी त्रस्त आहेत. 

चिकोत्रा प्रकल्पातील पाणी, पोषक हवामान यामुळे पारंपारिक शेतीला छेद देत वर्षाकाठी तीन चार पिके हाती कशी लागतील याकडे शेतकरी शेतीकडे पाहू लागला आहे. या भागात शेतकऱ्यांनी उसासह मका, मिरची, वाटाणा, घेवडा, तूर, पावटा या पिकांची मोठ्या प्रमाणात लागवड केली आहे. शेतकऱ्यांना दिवसा गव्यांचा त्रास उद्‌भवत नाही. रात्री दहा ते पहाटे सहापर्यंत मात्र गव्यांचा शेतात धुमाकूळ सुरू असतो. उसतोडणीनंतर रानात आलेले उसाचे कोवळे कोंब, लुसलुशीत मका, गवे फस्त करत आहेत. शेतकऱ्यांना रात्री जागाव्या लागत आहेत. यासाठी शेतात प्रकाश झोत सोडणे. रेडिओवर मोठ्यानी गाणी लावणे, असे उपाय केले जात आहेत. 

गव्यांचे दोन कळप 
आठ दिवसापुर्वी गवे धामणे काळाम्मा बेलेवाडी (ता.कागल) परिसरात होते. 15 ते 20 गव्यांचे दोन कळप या परिसरात वावरत होते. चार दिवसापुर्वी धामणे परिसरातील डोंगराला वणवा पेटला यामुळे हे दोन्ही कळप एक ठिकाणी येवून बेलेवाडीच्या रानात घुसले. मोठा कळप असल्याने त्यांनी ऊस पिक फस्त केले. 

नुकसान भरपाई
ऊस पिकासाठी वनखात्याकडून नुकसान भरपाई मिळते. यासाठी शेतकऱ्यांना 7/12, 8 अ चा उतारा, छायाचित्र, समजुतीचा नकाशा, आधारकार्ड व बॅंक पासबुक द्यावे. 
- नागेश खोराटे, वनरक्षक 

loading image