पन्हाळा पंचायत समिती सभापतीपदी वैशाली पाटील याची निवड

पन्हाळा पंचायत समिती सभापतीपदी वैशाली पाटील याची निवड

आपटी (कोल्हापूर) : पन्हाळा (panhala)पंचायत समिती सभापती निवडीसाठी पन्हाळा पंचायत समितीच्या सभागृहात पार पडलेल्या  विषेश सभेत सभापती पदी वैशाली प्रकाश पाटील (vaishali patil) यांची बिनविरोध निवड झालेचे निवडणूक निर्णय अधिकारी तथा तहसिलदार रमेश शेंडगे(Tehsildar Ramesh Shendge) यांनी जाहीर केले. (vaishali-patil-elected-as-panhala-panchayat-samiti-chairperson-kolhapur-political-news)

पन्हाळा पंचायत समितीमध्ये जनसुराज्य शक्ती पक्षाचे निर्विवाद बहुमत आहे.पक्षाचे अध्यक्ष आमदार डॉ. विनय कोरे यांनी पन्हाळा पूर्व व पश्चिम भागाचा समतोल राखण्याची परंपरा कायम ठेवली आहे. त्यामुळे पूर्व पन्हाळ्यातील माले  गणातून निवडून आलेल्या वैशाली प्रकाश पाटील यांचे नाव सभापती पदी, सर्वानुमते निश्चित केले होते. वैशाली पाटील यांच्यामुळे माले गणा बरोबरच माले गावालाही पंचायत समितीच्या इतिहासात पहिल्यांदाच सभापती पदाचा मान मिळाला आहे. ठरलेल्या फॉर्म्युल्यानुसार सभापती तेजस्विनी रणजित शिंदे यांचा कार्यकाल पूर्ण झाल्यानंतर अन्य सदस्यांना संधी देण्यासाठी शिंदे यांनी राजीनामा दिला होता.सौ. तेजस्विनी शिंदे यांनी सभापती पदाच्या कालावधीत तालुक्यातील ग्रामपंचायतींच्या माध्यमातून अनेक योजना नियोजनबध्द व प्रभावीपणे राबवून आपल्या कामाचा ठसा उमटवला आहे. त्यामुळे नूतन सभापतींच्या जबाबदारीत वाढ झाली आहे.

  यावेळी जनसुराज्यचे प्रवक्ते व सरचिटणीस अॅड.राजेंद्र पाटील, मावळत्या सभापती सौ. तेजस्विनी शिंदे,विद्यमान उप सभापती रश्मी कांबळे,पंचायत समिती सदस्य अनिल कंदूरकर, संजय माने,उज्वला पाटील, सदस्य पृथ्वीराज सरनोबत,गीता पाटील, प्रकाश पाटील,रवी चौगले, रेखाताई बोगरे हजर होते. पन्हाळा पंचायत समिती जवळ तालुक्यातील जनसुराज्य प्रेमीनी गर्दी केली होती.

सभापती पदाच्या काळात पाणी,आरोग्य,शिक्षण,दळण-वळणासह शासनाच्या सर्वच योजना प्रभावीपणे राबवून आमचे नेते डॉ.विनयजी कोरे यांनी माझेवर टाकलेला विश्वास सार्थ ठरविन.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com