पिंपरी : वैष्णवी हगवणे यांच्या मृत्यू प्रकरणात (Vaishnavi Hagawane Death Case) पसार संशयितांना आश्रय दिल्याप्रकरणी पिंपरी-चिंचवड पोलिसांनी (Pimpri-Chinchwad Police) आज रात्री पाच जणांना अटक केली. यामध्ये कर्नाटकचे माजी ऊर्जामंत्री वीरकुमार पाटील (Veerkumar Patil) यांचा मुलगा प्रीतम याचा समावेश आहे. या कारवाईनंतर या प्रकरणातील संशयितांची संख्या आता अकरा झाली आहे.