
मंगळवार पेठेत ११ वाहनांची तोडफोड
कोल्हापूर : मंगळवार पेठेतील शेळके उद्यानाशेजारील रस्त्यावर उभ्या असलेल्या ११ मोटारीची तोडफोड करण्यात आली. हा प्रकार आज सकाळी उघड झाला. यामुळे परिसरातील नागरिकांत घबराट निर्माण झाली. यात ४५ हजारांचे नुकसान झाले. याप्रकरणी संशयावरून एकास ताब्यात घेण्यात आले. स्वप्नील बाळकृष्ण तावडे असे त्या संशयिताचे नाव असल्याचे पोलिसांनी सांगितले.
पोलिसांनी दिलेली माहिती, मंगळवार पेठेतील पद्मावती मंदिराजवळ उद्यानाशेजारील रस्त्यावर परिसरातील नागरिकांनी चारचाकी पार्किंग केल्या होत्या. अंधाराचा फायदा घेत अज्ञाताने रस्त्यावर शेजारी शेजारी उभ्या असणाऱ्या ११ चारचाकींची तोडफोड केली. हा प्रकार सकाळी फिरायला जाणाऱ्यांच्या निदर्शास आला. त्यांनी याची माहिती संबंधित मोटार मालकांना दिली. त्यांनी घटनास्थळी गर्दी केली. याची माहिती जुना राजवाडा पोलिसांना मिळाली. पोलिसांनी घटनास्थळी
धाव घेतली. दरम्यान, सिद्धिविनायक गवळी यांनी यासंबधी दिलेल्या फिर्यादेनुसार संशयित तावडेला ताब्यात घेतल्याचे पोलिस निरीक्षक दत्तात्रय नाळे यांनी सांगितले.
खांबावरील विजेचा प्रश्न
या रस्त्यावरील विद्युत खांबावरील वीज प्रवाह अनेकदा खंडित झालेला असतो. त्यामुळे येथे अंधाराचे साम्राज्य असते. त्याचा फायदा अपप्रवृत्तीकडून घेतला जातो. याकडे प्रशासनाने लक्ष द्यावे. या भागात रात्रीची गस्त वाढवा, अशी मागणी परिसरातील नागरिकांकडून होत होती.
Web Title: Vehicles Vandalized Panic Among Citizens
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..