मुसळधार पावसामुळे कृष्णा, पंचगंगेच्या पातळीत वाढ ; नृसिंहवाडीत नागरी वस्तीत शिरले पाणी 

Water seeped into the urban area of ​​Nrusinhwadi
Water seeped into the urban area of ​​Nrusinhwadi

नृसिंहवाडी - कृष्णा आणि पंचगंगा नदीची पाणीपातळी सध्या झपाट्याने वाढत असल्यामुळे अनेक नागरी वस्तीत पाणी  शिरले आहे. बौद्ध नगर वस्तीमधील चार कुटुंबाने बौद्ध समाज मंदिरात आश्रय घेतला आहे. मिठाई व्यवसायिकांसह पूरग्रस्तांनी आपले साहित्य सुरक्षित ठिकाणी हलविण्याच्या हालचाली गतिमान केल्या आहेत.

राधानगरी, कोयना , वारणा या धरणातून होणारा पाण्याचा विसर्ग व धरण पाणलोट क्षेत्रात झालेल्या कमी अधिक पावसामुळे कृष्णा आणि पंचगंगा नद्यांची पातळी  दिवसेंदिवस वाढत असून दत्त मंदिर पूर्ण पाण्याखाली बुडाले असून उत्सव मूर्तीची नारायण स्वामीच्या मंदिरात पूजा अर्चा करण्यात येत आहे. येथील नागरी वस्तीतील पंधराहून अधिक घरांमध्ये पुराच्या पाण्याने प्रवेश केला आहे.

बाबर वसाहतीतील आणि घरांमध्ये सध्या पाणी शिरत असून याठिकाणी अनेक घरांमध्ये व मंगल कार्यालय मध्ये पाणी शिरले आहे. दत्त मंदिर व्यापारी मार्गावरील बिद्रे ,जाधव ,पुजारी,  मुळे,  या मेवामिठाई व्यावसायिकांनी आपल्या मिठाईसहअनेक साहित्य सुरक्षित उंचावर ठेवण्यासाठी त्यांची लगबग सुरू आहे.  

शशिकांत पुजारी यांनी यांनी आपले खेळण्याचे दुकान, राजेंद्र जोशी यांनी आपले स्टील भांडी दुकान सुरक्षित ठिकाणी हलवले आहे. गतवर्षीच्या महापुराच्या  कटू आठवणी समोर ठेवून अनेक पूरग्रस्त वेळेपूर्वीच सुरक्षित ठिकाणी स्थलांतरीत झाले आहेत.

 दरम्यान, एकूणच महापुरामुळे भीतीची छटा पसरली असून पाच ते सात फूट आणखीन पाणी वाढल्यास काही पूरग्रस्त शिरोळ, जयसिंगपूर, सांगली इचलकरंजी व पाहुण्याकडे  कुटुंब सोबत जाण्याच्या मानसिकतेत आहेत.

   
संपादन - धनाजी सुर्वे 

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com