western Maharashtra farmers irrigation water demand
esakal
कोल्हापूर : पश्चिम महाराष्ट्रातील धरणे भरलेली असताना येथील शेतीसाठी बारा महिने पाणी राखीव ठेवावे, अशी मागणी इरिगेशन फेडरेशनच्या नेत्यांसह आक्रमक झालेल्या शेतकऱ्यांनी केली. येथील शेतीला पुरेसे पाणी दिल्यानंतरच उर्वरित पाणी कर्नाटकासह अन्य भागांना द्यावे. मात्र, स्थानिक शेतकऱ्यांच्या सहनशीलतेचा अंत पाहू नका, अशा तिखट शब्दात इशारा शेतकऱ्यांनी त्यांनी जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांना दिला.