Former MLA KP Patil
Former MLA KP Patilesakal

Radhanagari : हसन मुश्रीफांचा 'दोस्त' कोणाला साथ देणार? साहेब की दादा, 'केपीं'च्या राजकीय भूमिकेकडं लक्ष्य

राज्यात राष्ट्रवादी पक्षात फूट पडल्यानंतर माजी आमदार के. पी. पाटील व जिल्हाध्यक्ष ए. वाय. पाटील काय निर्णय घेतात याकडे लक्ष लागून राहिले होते.
Summary

जिल्हाध्यक्ष ए. वाय. पाटील यांनी अजित पवार यांना पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला. यामुळे केपींच्या आजच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष वेधले होते.

गारगोटी : माजी आमदार के. पी. पाटील (K. P. Patil) यांनी राधानगरी मतदारसंघातील (Radhanagari Constituency) प्रमुख कार्यकर्त्यांची बैठक घेतली. या बैठकीत कार्यकर्त्यांची मते आजमावून घेण्यात आली. या वेळी सर्वाधिक कार्यकर्त्यांनी तुम्ही शरद पवार यांच्यासमवेतच राहावे, अशी भावना व्यक्त केली.

Former MLA KP Patil
Loksabha Election : अजितदादांचा भाजपला पाठिंबा मिळताच लोकसभेचं बदललं चित्र; राऊतांची वाढणार डोकेदुखी

तर काहींनी राजकीय अडचणी लक्षात घेत अजित पवार यांना साथ द्यावी, असे मत व्यक्त केले. मात्र कोणत्याही ठोस निर्णयाविना ही बैठक संपली. राज्यात राष्ट्रवादी पक्षात फूट पडल्यानंतर माजी आमदार के. पी. पाटील व जिल्हाध्यक्ष ए. वाय. पाटील काय निर्णय घेतात याकडे लक्ष लागून राहिले होते.

जिल्हाध्यक्ष ए. वाय. पाटील यांनी अजित पवार यांना पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला. यामुळे केपींच्या आजच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष वेधले होते. हुतात्मा स्वामी-वारके सूतगिरणीवर बैठकीस कार्यकर्त्यांनी मोठी गर्दी केली होती. चर्चेत अजित पवार यांच्याबरोबर जाण्यास बहुतांश कार्यकर्त्यांनी विरोध दर्शविला.

Former MLA KP Patil
Nana Patole : 'फुले-शाहू-आंबेडकरांच्या महाराष्ट्रात जे पाप घडलंय, त्याचे परिणाम भाजपला भोगावे लागतील'

तर काहींनी ‘केपी’ यांचे मित्र मंत्री हसन मुश्रीफ यांनी अजित पवार यांचे समर्थन केल्याने त्यांच्यासमवेत जावे, असे मत व्यक्त केले. सर्वांची भूमिका लक्षात घेतल्यानंतर के. पी. पाटील यांनी निर्णय स्थगित ठेवला. यामुळे कोणत्याही ठोस निर्णयविना ही बैठक संपली. काही दिवसांनी पुन्हा बैठक घेऊन योग्य निर्णय घेऊया, असे ठरले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com