हृदयद्रावक : पतीचा मृत्यू झाला, तिने तो मृतदेह हातगाडीवरुन ढकलत नेऊन केले अंत्यसंस्कार...

wife carried the body from the cart and performed the funeral rites on husband
wife carried the body from the cart and performed the funeral rites on husband
Updated on

अथणी (बेळगाव) - कोरोना महामारीमुळे गेले तीन महिने नागरिक लॉकडाऊनमध्ये सापडून तडफडत आहेत. दररोज मजुरी करून पोटाची खळगी भरणारे एक दिवसाच्या अन्नाला देखील महाग झाले आहेत. त्याच पार्श्वभूमीवर अन्नाविना तळमळून मरण्याची वेळ अथणी शहरातील सदाशिव होरटी (वय 55) यांच्यावर आली. मृत्यू झाल्यानंतर कोरोनाच्या पार्श्वभूमीवर भीतीने कोणीही अंत्यसंस्काराला आले नाहीत. अखेर हातीगाडीवरुन मृतदेह ठेवून नेण्याची वेळ पत्नी, मुलगा व बाहेरील एका व्यक्तीवर आली. अथणी शहरात काल (ता.17) सायंकाळी ही हृदयद्रावक घटना घडली. त्यासंबंधीचे व्हिडीओ देखील व्हायरल झाल्याने त्याची चर्चा सर्वत्र आहे.

याबाबत सविस्तर माहिती अशी, अथणी सरकारी दवाखानासमोर सदाशिव होरटी हा चप्पल व्यवसाय करीत होता. पण लॉकडाउनमुळे काम मिळाले नाही. त्याच्या पोटापाण्याचा प्रश्नही गंभीर बनला. त्यातच त्याचा मृत्यूही झाला. घरात त्याची पत्नी व मुलगा असा परिवार आहे. गेले दोन दिवस तो आजारी पडून घरी रहात होता. बाहेर कोणतेही काम नसल्याने अडचण झाली होती. मृत्यू झाल्यानंतर लांबूनच पाहण्यासाठी लोकांची गर्दी झाली होती. मात्र शहरात कोरोनाचा जोरात फैलाव सुरू असल्याने भीतीपोटी अंत्यसंस्कारासाठी नेण्यास कुणीही पुढे आले नाही. अखेर पत्नी महादेवी होरटी, मुलगा मुत्ताप्पा होरटी व बाहेरील सुरेश बंत्री या तिघांनीच हातगाडीवर मृतदेह ठेवून स्मशानभूमीपर्यंत नेऊन अंत्यसंस्कार केले.

कोणताही आजार झाला तरी कोरोनाच झाल्याच्या अफवा पसरत आहेत. त्यात मृत्यू झाल्यास मोठ्या प्रसंगाला तोंड द्यावे लागत आहे. अंत्यसंस्कारासाठी कमी उपस्थिती दिसत आहे. सदाशिव होरटी त्यांचा मृतदेह नेताना पत्नी व मुलगा यांच्या डोळ्यातून अश्रूंच्या धारा वाहत होत्या. असा प्रसंग कोणावरही येऊ नये, याचा प्रत्यय यावेळी त्यांना आला.

माणुसकी गेली कुठे ?

मरण हे कुणालाही सुटलेले नाही. त्यामुळे सर्व काही विसरून त्यातील विधींना शत्रुदेखील हजेरी लावतो. मात्र अथणी येथील केवळ तिघांवर अंत्यसंस्कार करण्याची वेळ आली. अशी शहरातील बहुधा पहिलीच घटना असावी. त्यामुळे माणुसकी गेली कुठे? असा प्रश्न ऐरणीवर आला आहे. सोशल मीडियावर हा व्हिडीओ व्हायरल झाल्याने हरपलेल्या माणुसकीची चर्चा सुरू आहे. तसेच हळहळ देखील व्यक्त होत आहे.

संपादन - मतीन शेख

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com