नागाव : पुणे - बंगळूर राष्ट्रीय महामार्गालगत (Pune-Bangalore National Highway) कचऱ्याच्या ढिगात महिलेचा संशयास्पद मृतदेह मिळाला. मुक्ताबाई मारुती गोरे (वय ५२, रा. शिरोली हायस्कूल शेजारी, पुलाची शिरोली, ता. हातकणंगले) असे मृत महिलेचे नाव आहे. चेहऱ्याच्या उजव्या बाजूस कानाच्या वर गंभीर मार लागल्यामुळे हा मृत्यू झाल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी (Police) व्यक्त केला आहे.