सततच्या त्रासाला कंटाळून प्रियंका हिने मंगळवारी (ता. १०) सकाळी साडेदहाच्या सुमारास घरात गळफास घेऊन आत्महत्या केली.
कोडोली : साखर कारखाना (Sugar Factory) खरेदीसाठी माहेरहून पैसे आणण्यासाठी सतत होणाऱ्या छळास कंटाळून विवाहितेने गळफास घेऊन आत्महत्या केली. प्रियंका रणजित पाटील (वय ३१) असे तिचे नाव आहे. आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी कोडोली पोलिस ठाण्यात (Kodoli Police Station) बाबू पार्क, बहिरेवाडी (ता. पन्हाळा) येथील सहा जणांवर हुंडाबळी कायद्यानुसार गुन्हा दाखल केला असून, चौघांना अटक केली आहे.