शिसाळ या मोटारसायकलवरून रस्त्यावर जोरात आपटल्या. यामध्ये त्यांचा जागीच मृत्यू झाला, तर संदीप हराळे हे किरकोळ जखमी झाले.
नागाव : मोटारसायकलला भरधाव डंपरने पाठीमागून धडक (Dumper Accident) दिल्याने महिला जागीच ठार झाली, तर एक जण जखमी झाला. छाया युवराज शिसाळ (वय २८, विठ्ठलनगर, शिये, ता. करवीर, जि. कोल्हापूर) असे मृत महिलेचे नाव आहे, तर संदीप हराळे (रा. भुयेवाडी, ता. करवीर) हा यामध्ये किरकोळ जखमी झाला आहे. शिये फाटा ते शिये मार्गावर असणाऱ्या पाषाण शाळेजवळ रात्री आठच्या सुमारास हा अपघात झाला.