कोल्हापूर : ‘ब्रह्मपुरी’ मोजणीनंतर नकाशाचे काम सुरू

नवीन शिवाजी पूल उभारताना नगरभूमापन विभागाने घाईने मोजणी करून ते ब्रह्मपुरी या पुरातत्त्व विभागाकडील टेकडीपासून शंभर मीटरच्या बाहेर असल्याचा अहवाल दिला
नवीन शिवाजी पूल
नवीन शिवाजी पूलsakal
Updated on: 

कोल्हापूर : ब्रह्मपुरी टेकडीवरील मोजणी काल (ता. २) संपल्यावर आज नकाशा तयार करण्याचे काम सुरू झाले. नवीन शिवाजी पुलाचे काम ब्रह्मपुरी या पुरातत्त्व विभागाकडे असलेल्या टेकडीपासून १०० मीटर अंतराच्या आत की बाहेर झाले, याचा निर्णय नकाशा तयार झाल्यावर होणार आहे. त्याचे कार्यालयीन कामकाज दिवसभर सुरू होते.

नवीन शिवाजी पूल उभारताना नगरभूमापन विभागाने घाईने मोजणी करून ते ब्रह्मपुरी या पुरातत्त्व विभागाकडील टेकडीपासून शंभर मीटरच्या बाहेर असल्याचा अहवाल दिला होता. त्यानंतर पुलाचे रखडलेले काम पूर्ण केले. त्यानंतर याचिकाकर्ते यांनी थेट उच्च न्यायालयात दाद मागितली. तेथील सुनावणीनंतर त्यावेळी केलेली मोजणी मुंबई उच्च न्यायालयाने रद्द ठरविली आहे. काही तांत्रिक बाबींचा अभाव असल्याने ही मोजणी पुन्हा चार आठवड्यांत करण्याचे आदेश उच्च न्यायालयाने नगरभूमापन अधिकारी यांना दिले होते. त्यानुसार ब्रह्मपुरी टेकडी परिसरातील मोजणी काल पुरात्त्व विभागाच्या अधिकाऱ्यांसमोर करण्यात आली. यावेळी नोटीस दिलेले आणि याचिकाकर्ते उपस्थित होते. प्रत्यक्षात मोजणी संपल्यानंतर घेतलेल्या मापांची मोजणी आणि त्याचा नकाशा करण्याचे काम सुरू आहे.

नकाशा तयार झाल्यावर टेकडीपासून किती मीटर अंतरावर शिवाजी पुलाचे काम झाले आहे, हे निश्‍चित होणार आहे. याबाबतचा अहवाल पुरातत्त्व विभाग आणि जिल्हाधिकारी यांना सादर करण्यात येणार आहे.

- किरण माने, नगरभूमापन अधिकारी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Viral Audio Allegations Against Ravikiran Ingawale
Kolhapur District Bank Election 2026 Draft Voter List To Be Published Soon Polling Likely In December
Punyashlok Ahilyadevi loan waiver
Kolhapur Gokul Milk Union Election
Marathi News Esakal
www.esakal.com