अतिवृष्टी काळात अतिरिक्त पाणी भोगावती आणि दूधगंगा खोऱ्यात सोडून पूरस्थितीची तीव्रता कमी करण्यासाठी करंजफेण-नरतवडे बोगद्याची योजना प्रस्तावित करण्यात आली आहे.
कोल्हापूर : येथील पंचगंगा-कृष्णेच्या महापुराची (Panchganga-Krishna Flood) व्याप्ती कमी करण्यासाठी होणाऱ्या उपाययोजनांसाठी जागतिक बँक (World Bank) अर्थसाहाय्य करणार आहे. यासाठी जागतिक बँकेच्या प्रतिनिधींनी पंचगंगा आणि कृष्णेच्या पूरप्रवण क्षेत्रांची पाहणी केली.