सांगलीच्या ‘गज्या’ चा मृत्यू; हत्तीसारख्या देहामुळे गिनिज बुकात होती नोंद | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Gajya Bull

सांगलीच्या ‘गज्या’ चा मृत्यू; गिनिज बुकात होती नोंद

तुंग (सांगली) : महाराष्ट्रातील सर्वांत मोठा बैल म्हणून गिनिज बुकात (World Records Guinness Book) नावलौकिक मिळवलेला... जन्म बैलाचा पण देह हत्तीचा असा भासणाऱ्या कसबे डिग्रज (ता. मिरज) येथील गज्या बैलाने आज अखेरचा श्वास घेतला. (world-records-guinness-book-of-gajya-bull-died-in-today-kasbe-digraj-sangli-news)

कृष्णा सायमोते गज्या बैला सोबत

कृष्णा सायमोते गज्या बैला सोबत

कृष्णा सायमोते आणि त्यांच्या कुटुंबियांनी सहा फूट उंच आणि दहा फूट लांब आकाराच्या, तसेच जवळपास १ टन वजन असलेल्या गज्याला आपल्या घरातील सदस्यांप्रमाणे वाढवले होते. महाराष्ट्रासह अनेक राज्यांमधील कृषी प्रदर्शनात विशेष आकर्षण राहिलेल्या गज्याने आजवर अनेक पुरस्कार मिळवले. त्याच्या अवाढव्य शरीरयष्टी, देखणेपणा आणि वजनामुळे कृषी प्रदर्शनात मोठी मागणी असायची. या माध्यमातून मालक सायमोते यांना गज्याने कर्जमुक्त केले होते.

महाराष्ट्रातील सर्वांत मोठा बैल म्हणून गिनिज बुकात नावलौकिक

महाराष्ट्रातील सर्वांत मोठा बैल म्हणून गिनिज बुकात नावलौकिक

दै. ‘सकाळ''नेही त्याला प्रसिद्धी दिली होती. त्याच्या कुंटुबीयांनी न विकता त्याचा शेवटपर्यत सांभाळ केला.बुधवारी दुपारी त्याचा हृदयविकाराने मृत्यू झाला. कृष्णा सायमोते यांनी त्यांच्या घरच्या शेतात गज्यावर अंत्यसंस्कार केले.

कसबे डिग्रजच्या  गावकऱ्यांनी गज्याला वाहिली श्रध्दांजली

कसबे डिग्रजच्या गावकऱ्यांनी गज्याला वाहिली श्रध्दांजली

गज्याच्या अकाली जाण्याने कसबे डिग्रजसह तमाम बैलप्रेमींनी हळहळ व्यक्त केली. प्रचंड देह आसलेल्या गजाच्या हाडांचा सापळा शास्त्रीयदृष्ट्या संग्राहलयात ठेवण्यासाठी प्रयत्न करणार आसल्याचे सांगितले.

गज्या सोबत गावकरी

गज्या सोबत गावकरी

Web Title: World Records Guinness Book Of Gajya Bull Died In Today Kasbe Digraj Sangli

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..