esakal | अंबाबाई मंदिरात कोरोना बचावासाठी घेतली जाणार अशी काळजी....
sakal

बोलून बातमी शोधा

Worries that Corona will be taken to the Ambai Temple for rescue

अंबाबाई मंदिरात कोरोना बचावासाठी घेतली जाणार अशी काळजी....

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

कोल्हापूर - देशात कोरोना व्हायरसची भिती पसरत असतानाच प्रशासन घबरदारीच्या भुमिका घेत आहे. केंद्र शासन तसेच राज्य शासन कोरोना पासून वाचण्यासाठी उपाय योजना आखत आहे. कोल्हापूरच्या अंबाबाई मंदिरात येणारे भाविक तसेच पर्यटक हे देश - विदेशारातून येत असतात. त्यामुळे देवस्थान समितीने काही निर्णय घेतले आहेत.

देवस्थान समिती मंदिरात येणाऱ्या प्रत्येक भाविकाच्या हातात सॅनिटायझर देण्यात येणार आहे. तसेच मंदिराच्या चार ही दरवाज्यातुन  येणाऱ्या भाविकांच्या भाविकांचे हात स्वच्छ होण्यासाठी सुविधा ऊभी केली जाणार आहे. 
भाविकांच्या आरोग्याच्या काळजीसाठी तातडीने दोन दिवसात ही यंत्रणा ऊभी केली जाणार आहे.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कोल्हापूरच्या अंबाबाई मंदिरात विशेष काळजी घेण्यात येत आहे. अंबाबाई मंदीराची स्वच्छता करण्याबरोबरच पेस्ट कंट्रोलही केले जात आहे. भाविकांनी कोरोना होऊ नयेयासाठी काय काळजी घ्यावी, याबाबत सूचना देण्यात येत आहेत. येत्या दोन दिवसात मंदिराच्या चारही दरवाजातून येणार्या भाविकांच्या हातावर सॅनिटायझर देण्याची यंत्रणा उभी करण्यात येत आहे. त्यामुळे भाविक स्वच्छ हाताने मंदीरात येतील, अशी माहिती पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचे अध्यक्ष महेश जाधव यांनी दिली.


 

loading image