यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ

यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ

मुक्त विद्यापीठात विविध अभ्यासक्रमांना प्रवेश प्रक्रिया सुरू
कोल्हापूर, ता. ७ : यशवंतराव चव्हाण महाराष्‍ट्र मुक्त विद्यापीठात विविध अभ्यासक्रमांना प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे. त्यानुसार इच्छुकांनी प्रमाणपत्र, पदवी, पदविका तसेच पदव्युत्तर अशा आठ शाखांत ९८ अभ्यासक्रम आहेत. यातील अपेक्षित विषयाला प्रवेश घेता येणार आहेत. त्यासाठी ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया राबविली जात आहे. नियमित पदवीसोबत दुरशिक्षण विभागांर्तगत दुसरी पदवी घेता येणार आहे.

मानव्य विद्या व सामाजिक शास्त्र विद्या शाखा, वाणिज्य व व्यवस्थापन शाखा, विज्ञान शाखा, आरोग्य विज्ञान शाखा, शिक्षण शास्त्र शाखा, संगणक शास्त्र शाखा, कृषी विज्ञान शाखा, कृषी व्यवसाय व्यवस्थापन या विषयात पदविका अभ्यासक्रम आहेत. येत्या ३१ जुलैपर्यंत प्रवेश अर्ज ऑनलाईन पद्धतीने करता येणार आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com