हेमांडपंथी रंकभैरव मंदीराला पुन्हा झळाळी; 15 तरुणांचे कौतुक

हेमांडपंथी रंकभैरव मंदीराला पुन्हा झळाळी; 15 तरुणांचे कौतुक
Updated on

कोल्हापूर: यंदाच्या लॉकडाऊनच्या (Lockdown) काळात सगळेच मोबाईल ,टिव्ही (Mobile, TV)आणि गप्पागोष्टी यामध्ये गुंतले होते, मात्र बिन खाबी गणेश मंदीर जवळील रंकभैरव मंदीर (Rankabhairav ​​Temple)परिसरातील पंधरा तरुणांनी लॉकडाऊनच्या काळात संधीचं सोनं केले.आणि श्रमदानाने हेमांडपंथी रंकभैरव मंदीराला पुन्हा झळाळी आणली.youths-renovated-rank-bhairav-temple-in-lockdown-kolhapur-news

सातव्या आठव्या शतकातील महालक्ष्मी बॅंकेच्या छोट्या बोळात श्री रंकभैरव मंदीर आहे. या मंदीरातील पालखी सभागृहात असलेल्या सुमारे चाळीस नक्षीदार खांबांना काळाच्या ओघात रंगांचे थरावर थर लावले गेले त्यामुळे नक्षीदार व रेखीव कलाकुसर दिसत नव्हती. येथील तरुणांनी लॉकडाउन म्हणजे एक संधीच मानून घरात न बसता, वेळेचा सदुपयोग केला पाहिजे या हेतुने मंदीरातील प्रत्येक खांब घासून त्यावरील जुने रंग काढून आणि पाण्याच्या जोराच्या प्रेशरने खांबावरील मुळ नक्षीदार कलाकुसरीला झळाळी आणली.कोल्हापूरच्या प्राचिन इतिहासाच्या दाखल्यानुसार या मंदीराचे महत्व मोठे असून साधारण अंबाबाई मंदीर ज्यावेळी बांधले त्यावेळी हे मंदीर बांधले आहे.

वर्षातून तीन वेळा श्री अंबाबाईची पालखी या मंदीरापर्यन्त येते .मंदीराजवळ राहणाऱ्या तरुणांनी मंदीरातील खांबावर असलेली मुळ नक्षीकाम कलाकुसर रंगाच्या आड दडलेलं पुन्हा नव्याने मुळ स्वरुपात आणले.मंदीराचे प्राचिन वैभव नव्या पिढीने कसे नजरेसमोर आणले जावू शकते याचे उत्तम उदाहरण या तरुणांनी घालून दिले आहे.या लॉकडाउनच्या श्रमदानामध्ये राहुल जाधव (जप्तन मुलुख) सचिन जाधव,प्रमोद गुरव ,आशिष जाधव ,रवि कंराडे ,रोहित गुरव,पिंटु गुरव, सिध्देश डवरी, ऋषिकेश डवरी, संदीप जाधव, विशाल जाधव ,ओंकार डवरी,दिपक गुरव,रोहित गुरव,माणिक जाधव, दिलिप डवरी,दिलीप वाला,केदार गुरव, योगराज गुरव,सचिन फराकटे,दिंगबर जाधव,बाळ डवरी,सुरेश गुरव, राम कोरवि,बापु जाधव,धोंडिराम गुरव,शुभम निळखंठ ,सुजंल पोवार,राजदिप गुरव,अर्जुन मामा प्रसाद कर्वे,आयुश खेडेकर सहभागी होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Sahyadri Express
Kolhapur flood situation latest
Bay of Bengal Weather System Maharashtra Rain Alert
Panhala Police Act Swiftly After Huge Tree Falls Across Main Road
Marathi News Esakal
www.esakal.com