esakal | इचलकरंजीतील वाढता संसर्ग रोखण्यासाठी होणार 'या' उपाय योजना
sakal

बोलून बातमी शोधा

इचलकरंजीतील वाढता संसर्ग रोखण्यासाठी होणार 'या' उपाय योजना

शहरात अद्यापही कोरोना संसर्ग कमी झालेला नाही. त्याचा आढावा यावेळी घेण्यात आला.

इचलकरंजीतील वाढता संसर्ग रोखण्यासाठी होणार 'या' उपाय योजना

sakal_logo
By
सकाऴ वृत्तसेवा

इचलकरंजी (कोल्हापूर) : शहरातील कोरोना (Corona) संसर्ग रोखण्यासाठी एका बाधीत व्यक्तीच्या तीव्र संपर्कातील १० जणांचा शोध घेवून त्यांची कोविड तपासणी (Covid check)
करा, अशी स्पष्ट सूचना जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजयसिंह चव्हाण(sanjay singh chavan) यांनी केली.

हेही वाचा: हसन मुश्रीफ यांच्या इचलकरंजी भेटीच्या धोरणात्मक निर्णयाकडे लक्ष

कोरोनाचा वाढता संसर्ग रोखण्यासाठी विविध उपाययोजनांचा आढावा घेण्यासह तिस-या लाटेच्या पूर्वतयारीसाठीची प्रशासकीय बैठक शनिवारी पालिका सभागृहात पार पडली. यावेळी त्यांनी पालिकेच्या आरोग्य विभाग, नागरी आरोग्य केंद्राकडील कर्मचा-यांना मार्गदर्शन केले. अपर जिल्हाधिकारी किशोर पवार यांची प्रमुख उपस्थिती होती.

हेही वाचा: Good News : इचलकरंजी पालिकेला दीड कोटींचा निधी

शहरात अद्यापही कोरोना संसर्ग कमी झालेला नाही. त्याचा आढावा यावेळी घेण्यात आला. पालिकेकडून करण्यात येत असलेल्या उपाययोजनाची माहिती प्रास्ताविकमध्ये आरोग्य अधिकारी डाॅ.सुनिलदत्त संगेवार यांनी दिली. श्री.चव्हाण यांनी कोरोना संसर्ग रोखण्यासाठी विविध उपाय योजना करण्याबाबत यावेळी सूचना केल्या. यामध्ये काॅन्टॅक्ट ट्रेसिंग वाढण्यासाठी बाधीत रुग्णाच्या नातेवाईकांसह अन्य व्यक्तींचा शोध घेण्यावर भर द्यावा, असे आवाहन केले.

हेही वाचा: आयजीएम रुग्णालयाच्या स्वच्छतेचा प्रश्‍न मार्गी; इचलकरंजी पालिका नगराध्यक्षांचे आदेश

शहरातील मृत्यू दर कमी करण्यासाठी उपचारामध्ये अधिक कशी सुधारण करता येईल, याकडे लक्ष देण्याबाबत त्यांनी सूचविले. लसीकरणाची गती कमी आहे. त्याचा संदर्भ घेवून खासगी रुग्णालयात सशुल्क लसीकरणास परवानगी देण्याबाबतचे प्रस्ताव सादर करण्याचे आदेशही श्री.चव्हाण यांनी यावेळी दिले.

यावेळी नगराध्यक्षा अलका स्वामी, प्रांताधिकारी विकास खरात, मुख्याधिकारी प्रदीप ठेंगल, नगर अभियंता संजय बागडे आदी उपस्थित होते. कामगार अधिकारी विजय राजापूरे यांनी आभार मानले.

हेही वाचा: इचलकरंजी बाजारात अनेकांचे मास्क हनुवटीवरच

अौद्योगिक ठिकाणी कामगारांसाठी तपासणी शिबीर

पालिकेच्यावतीने अौद्योगिक ठिकाणी कामगारांची कोविड तपासणी करण्यासाठी दर पंधरा दिवसांतून शिबीर घेतले जाणार आहे. त्यासाठी आवश्यक कर्मचारी वर्ग नियुक्त करण्याचे काम सुरु आहे. याबाबतची माहिती मुख्याधिकारी ठेंगल यांनी यावेळी दिली.

इचलकरंजीला जादा लसीचे डोस मिळणार

इचलकरंजी शहरासाठी लोकसंख्येच्या तुलनेत अत्यंत कमी लसीचे डोस मिळत असल्याचे नगराध्यक्षा स्वामी यांनी निदर्शनास आणून दिले. त्यानंतर लसीचे डोस वाढवून देण्यास श्री.चव्हाण यांनी तत्काळ मान्यता दिली. जास्तीत जास्त डोस देण्याची व्यवस्था करण्यात येईल, असे त्यांनी यावेळी सांगितले.

loading image