esakal | राज्याचे लक्ष लागून राहिलेल्या गोकुळ दूध संघात 10 उमेदवारांचा बोलबाला

बोलून बातमी शोधा

null

राज्याचे लक्ष लागून राहिलेल्या गोकुळ दूध संघात 10 उमेदवारांचा बोलबाला

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

कोल्हापूर :जिल्ह्यासह राज्याचे लक्ष लागून राहिलेल्या गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीत जिल्हा परिषदेचा मोठा बोलबाला आहे. कारण दोन्हीही पॅनेलमध्ये जिल्हा परिषदेचे आजी, माजी सदस्य, किंवा सदस्याचे पती उमेदवार म्हणून रिंगणात आहेत. दोन्ही बाजुकडून एक,दोन नव्हे तर जवळपास 10 उमेदवार हे जिल्हा परिषदेशी संबंधित आहेत. महत्वाचे म्हणजे एक माजी अध्यक्ष आणि तीन उमेदवार हे जिल्हा परिषदेचे शिक्षण सभापती राहिले आहेत.

जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा व विद्यमान सदस्या शौमिका महाडिक यांना सत्ताधारी गटाने उमेदवारी दिली आहे. याच पॅनेलमधून जिल्हा परिषदेचे माजी शिक्षण सभापती राहिलेल्या बाळासाहेब खाडे व आंबरिष घाटगे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. तर विरोधी आघाडीनेही माजी शिक्षण सभापती अभिजित तायशेटे व माजी सभापती अमरसिंह पाटील यांना संधी दिली असल्याने एकूण चार माजी शिक्षण समिती सभापती गोकुळच्या रिंगणात उतरले आहेत.

विरोधी आघाडीतून कर्णसिंह गायकवाड हे निवडणूक लढवत आहेत. त्यांच्या पत्नी भाग्यश्री गायकवाड यांनी महिला व बालकल्याण समिती सभापती म्हणून काम केले आहे. तर त्यांचे बंधू योगिराज गायकवाड यांनीही जिल्हा परिषद सदस्य म्हणून काम केले आहे. अंजना रेडेकर यांनीही जिल्हा परिषद सदस्य म्हणून काम केले आहे. सत्ताधारी आघाडीचे दीपक पाटील यांच्या पत्नी ज्योती पाटील तर धैर्यशील देसाई यांचे भाउ राहूल देसाई यांनी सदस्य म्हणून काम केले आहे. तर त्यांच्या भावजय या सध्याच्या सभागृहात सदस्या आहेत. सदानंद हत्तरकी यांच्या मातोश्री या विद्यमान सभागृहाच्या सदस्या आहेत. सत्ताधारी आघाडीचे उमेदवार राजाराम भाटळे यांच्या पत्नीही सध्या जिल्हा परिषद सदस्या म्हणून काम करत आहेत.

Edited By- Archana Banage