कोळी महादेव आणि महादेव कोळी एकच 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 4 जानेवारी 2017

अकोले - ""कोळी महादेव व महादेव कोळी या दोन जमाती वेगळ्या नसून, एकच असल्याचा निर्वाळा सर्वोच्च न्यायालयाने दिल्याचे माजी मंत्री मधुकर पिचड यांनी आज सांगितले. हा सत्याचा विजय असल्याची प्रतिक्रिया त्यांनी व्यक्त केली. 

याबाबत पिचड म्हणाले, ""गेली काही वर्षे मी आदिवासी समाजामध्ये होणाऱ्या घुसखोरीबद्दल सातत्याने लढा देत आहे. खोटे व बोगस आदिवासी यांच्याविरुद्ध लढल्यानेच काहींनी मला त्रास देण्याच्या उद्देशाने माझ्या जातीबद्दल शंका घेतली. मात्र मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने माझ्या बाजूने निकाल दिला. असे असताना पिचड महादेव कोळी जातीचे नाहीत, आमदार वैभव पिचड यांची आमदारकी जाणार, अशा बदनामीकारक बातम्या देण्यात आल्या. त्रास देणाऱ्यांनी एवढ्यावरच न थांबता सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली. मात्र आज या न्यायालयाने कोळी महादेव व महादेव कोळी या दोन वेगळ्या जमाती नसून, एकच असल्याचा निर्णय दिल्याने, खऱ्या अर्थाने सत्याचा विजय झाला आहे.''

Web Title: koli mahadev & mahadev koli tribes one