कोथळे खुन खटल्यातील संशयित पोलिस हवालदार अरूण टोणे याचा मृत्यू

ह्रदयविकाराचा झटका; चार दिवसापूर्वी केले रुग्णालयात दाखल
कोथळे खुन खटल्यातील संशयित पोलिस हवालदार अरूण टोणे याचा मृत्यू

सांगली: बहुचर्चित अनिकेत कोथळे खून खटल्यातील संशयित बडतर्फ पोलिस हवालदार अरूण टोणे याचा आज ह्रदयविकाने मृत्यू झाला. चार दिवसापूर्वी त्याची प्रकृती खालावल्याने कारागृह प्रशासनाने तातडीने शासकीय रुग्णालयात नेले. तिथे परिस्थिती बिघडल्यानंतर एका खसगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. आज दुपारी त्याचा मृत्यू झाला.

सांगली शहर पोलिस ठाण्याच्या कोठडीत अनिकेत कोथळे याचा खून झाला होता. 6 नोव्हेंबर 2017 संशयावरुन अटक केलेल्या अनिकेत कोथळे याला पोलीसांनी तपासाच्या नावाखाली अमानुष थर्डडिग्रीचा वापर केला होता. त्यातच अनिकेतच मृत्यू झाला. त्यानंतर संबधित संशयीतांनी पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केला. अनिकेतचा मृतदेह आंबोली घाटातील निर्जनस्थळी जाळून टाकण्याचा प्रयत्न केला होता.

याप्रकरणी संशयीत बडतर्फ पोलिस उपनिरिक्षक युवराज कामटे, हवालदार अनिल लाड, अरुण टोणे, नसरुद्दीन मुल्ला, राहुल शिंगटे आणि झिरो पोलिस झाकीर पट्टेवाले आदींच्या विरोधात गुन्हा दाखल झाला. गेल्या काही दिवसांपूर्वी या खटल्याची जिल्हा न्यायालयात सुनावणी सुरू आहे. सुनावणीसाठी संशयितांना न्यायालयात आणणे सोयीचे व्हावे, यासाठी सर्वांना सांगली मध्यवर्ती कारागृहात ठेवण्यात आले होते.

दरम्यान, चार दिवसापूर्वी टोणे याला त्रास जाणवू लागला. कारागृह प्रशासनाने न्यायालयाच्या आदेशानुसार तातडीने उपचारासाठी शासकीय रुग्णालयात दाखल केले. त्यानंतर एका खासगी रुग्णालयात त्याच्यावर अँजिओप्लास्टी करण्यात आली होती. आज दुपारी ह्रदयविकाराचा जोरदार झटका बसला. त्यात त्याचा मृत्यू झाला. डॉक्‍टरांनी सायंकाळी मृत्यू झाल्याचे घोषित केले.

Edited By- Archana Banage

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com