esakal | सांगलीत दोघींना कोविड बाधा
sakal

बोलून बातमी शोधा

e

सांगली : महापालिका क्षेत्रात आज आणखी दोन रुग्णांची भर पडली. येथील हनुमानगर आणि शंभर फुटी रस्त्यावरील परिसरात दोन महिलांना कोविड बाधा झाल्याचे स्पष्ट झाले. त्यातील एक महिला कर्नाटकातून इथे आली होती. दुसरी स्थानिक रहिवासी आहे.

सांगलीत दोघींना कोविड बाधा

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

सांगली : महापालिका क्षेत्रात आज आणखी दोन रुग्णांची भर पडली. येथील हनुमानगर आणि शंभर फुटी रस्त्यावरील परिसरात दोन महिलांना कोविड बाधा झाल्याचे स्पष्ट झाले. त्यातील एक महिला कर्नाटकातून इथे आली होती. दुसरी स्थानिक रहिवासी आहे.
सांगलीत दिवसेंदिवस कोविड रुग्णांची संख्या वाढतच आहे. त्यामुळे कंटेनमेंट झोनही वाढत आहेत. बहुतेक रुग्णांचे मुंबई कनेक्‍शन असले तरी आता अनेक रुग्णांनी कोठेही अन्यत्र प्रवास केला नसल्याचेही स्पष्ट होत असून कम्युनिटी स्प्रेडचा धोका वाढल्याचे जाणकाराचे मत आहे. प्रशासनाने गेल्या आठ दिवसात विना हेतू फिरणाऱ्यांवर कठोर कारवाईचा बडगा उगारला आहे.