जतमधील कोविड सेंटरमुळे रूग्णांचा वेळ आणि पैसाही वाचणार

बादल सर्जे 
Wednesday, 23 September 2020

कोरोना बाधित रूग्णांवर तात्काळ उपचाराची सोय व्हावी, यासाठी जत तालुका इंडियन मेडिकल असोसिएशन पुढाकार घेतला आहे.

जत  : कोरोना बाधित रूग्णांवर तात्काळ उपचाराची सोय व्हावी, यासाठी जत तालुका इंडियन मेडिकल असोसिएशन पुढाकार घेतला आहे. यासाठी शासनाने दिलेल्या दरापेक्षा 25 टक्के कमी दरात ही सेवा असोसिएशनच्या माध्यमातून दिली जाणार आहे. त्यामुळे रूग्णांची जिल्ह्याच्या ठिकाणी भरमसाठ द्यावा लागणार पैसा वाचणार आहे. तर रूग्णांना तात्काळ उपचार मिळतील, असा विश्वास आमदार विक्रमसिंह सावंत यांनी व्यक्त केला. 

जत येथे सामाजिक न्याय विभागाच्या अनु-जाती व नवबौध्द मुलींची शासकीय निवासी शाळेमध्ये इंडियन मेडिकल असोसिएशन यांच्या मार्फत सुरू करण्यात आलेल्या कोविड सेंटर सुरू करण्यात आले. याचे उदघाटन आमदार विक्रमसिंह (दादा) सावंत यांच्या हस्ते झाले.

यावेळी प्रांताधिकारी प्रशांत आवटे, तहसीलदार सचिन पाटील, तालुका आरोग्य अधिकारी डॉ.संजय बंडगर, सीईओ मनोज देसाई, इंडियन मेडिकल असोसिएशन जत अध्यक्ष डॉ.रोहन मोदी, उपाध्यक्ष डॉ.शरद पवार, डॉ. काळगी, डॉ. गुरव, जत मंडळ अधिकारी संदीप मोरे, तलाठी रवींद्र घाडगे व सर्व पदाधिकारी पत्रकार उपस्थित होते. यावेळी असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. रोहन मोदी म्हणाले, आमदार विक्रमसिंह सावंत व प्रशासनाच्या माध्यमातून सामाजिक न्याय विभागाचे शासकीय वसतीगृह उपलब्ध करून देण्यात आले आहे. याठिकाणी 50 बेडचे ऑक्‍सिजन बेड व आठ व्हेंटीलेटर उपलब्ध करण्यात आले आहे. तर स्वतंत्र रुग्णवाहिका उपलब्ध केली आहे. त्यामुळे सर्वसामान्य माणसाला जतमध्येच वेळेवर उपचार मिळतील, कोणताही रूग्ण दगावणार नाही, याची काळजी घेता येईल. 

 

संपादन : प्रफुल्ल सुतार 

सांगली 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Kovid Center will also save patients time and money