Koyna Dam water storage 100 TMC
esakal
सांगली : पावसाळा शेवटच्या टप्प्यात असताना सप्टेंबर उजाडताच कृष्णा नदीकाठचे पुढील वर्षभराचे जलसंकट टळले आहे. कोयना धरणात १०० टीएमसी, तर चांदोली धरणात ३४ टीएमसी पाणीसाठा झाला (Chandoli Dam water storage 34 TMC) आहे. उपसा सिंचन योजना, धडक योजना, पिण्याचे पाणी, औद्योगिक वापर, तसेच विद्युतनिर्मितीसाठी पुरेसे पाणी उपलब्ध होणार आहे. ‘एल-निनो’च्या प्रभावामुळे यंदा पाणीटंचाई निर्माण होण्याची भीती होती. ती आता दूर झाली आहे. मात्र, वर्षभर पाण्याचे काटेकोर नियोजन आणि जपून वापर करण्याकडे बारकाईने लक्ष देण्याची गरज आहे.