Koyna Dam water reuse project Maharashtra
esakal
सांगली : कोयना जलविद्युत निर्मितीसाठी सोडले जाणारे पाणी पुन्हा विद्युत पंपांद्वारे उपसून शिवसागर जलाशयात आणण्याचा प्रकल्प सध्या चर्चेत आला आहे. दुष्काळी संकटाच्या पार्श्वभूमीवर या प्रस्तावाची चर्चा होत (Koyna Dam water reuse project Maharashtra) आहे. मात्र, हा प्रकल्प प्रत्यक्षात आणणे हे महाकाय आव्हान आहे. त्यासाठी लागणारी गुंतवणूक, प्रकल्प उभारणीचा खर्च आणि त्याची उपयुक्तता यांचे गणित जुळणार का, याबाबत तज्ज्ञांना शंका आहेत. त्याऐवजी दुष्काळी परिस्थितीत जलविद्युत निर्मितीत ५० टक्क्यांपेक्षा अधिक कपात करून उर्वरित पाणी सिंचनासाठी वळवणे हाच संयुक्तिक पर्याय असल्याचे मत व्यक्त केले जात आहे.