Koyna Dam Water Release
esakal
सांगली : कोयना धरणातून काल सकाळी आठ वाजता २ हजार ९३३ क्युसेकने विसर्ग वाढवण्यात आला. १ हजार ५० क्युसेक विसर्ग सुरू (Koyna Dam Water Release) होता. आता ३ हजार ९८३ क्युसेक पाणी कृष्णा नदीत सोडले असून, मंगळवारी (ता. २२) सायंकाळपर्यंत ते सांगलीत येण्याची अपेक्षा आहे. शेरीनाल्याच्या दूषित पाण्याने सांगली बंधाऱ्याजवळ भरलेले नदीपात्र वाहते होईल. त्याआधी शेरीनाल्याचे पाणी पंपाद्वारे उपसून धुळगाव योजनेला सोडले जाणार का, याकडे लक्ष आहे.