Koyna Dam Update : 'एल-निनो'चं संकट टळलं! अवघ्या 2 आठवड्यांत बदललं चित्र; कोयना धरण 80 टीएमसीच्या उंबरठ्यावर, 'कृष्णा'काठच्या शेतीचा प्रश्न मिटणार

Koyna Dam Water Storage Reaches 77 TMC : सततच्या पावसामुळे कोयना धरणातील जलसाठा ७७ टीएमसीवर पोहोचला असून लवकरच ८० टीएमसीचा टप्पा गाठण्याची शक्यता आहे. त्यामुळे सांगलीसह कृष्णाकाठच्या लाखो शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.
Koyna Dam latest water storage update

Koyna Dam latest water storage update

esakal

Updated on

सांगली : ‘एल्-निनो’चे संकट घोंघावत असताना अवघ्या दोन आठवड्यांच्या पावसाने कमाल केली आहे. कोयना धरणात आतापर्यंत ७७ टीएमसी साठा झाला आहे. सध्याची पाण्याची आवक पाहता लवकरच धरणातील साठा ८० टीएमसीवर जाण्याची शक्यता (Koyna Dam reaches 77 TMC) आहे. त्यानंतर परिस्थिती पाहून धरणातून विसर्ग सुरू केला जाऊ शकतो. ‘कृष्णा’काठासह सिंचन योजनांवर विसंबून काही लाख शेतकऱ्यांसाठी ही अत्यंत दिलासादायक आणि आगामी हंगामासाठी महत्त्वाची बातमी आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com