Krishna River Water Level : कोयना धरणातून 33 हजारांवर विसर्ग; कृष्णा नदीने ओलांडली 30 फुटांची पातळी, नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा!

Koyna Dam Water Storage Reaches 91 TMC : कोयना धरणातील पाणीसाठा ९१ टीएमसीवर पोहोचल्यानंतर पावसाचा जोर कमी झाल्याने धरणाचा विसर्ग घटवण्यात आला आहे. कृष्णा नदीची पाणीपातळी संथगतीने वाढत असून प्रशासन परिस्थितीवर लक्ष ठेवून आहे.
Krishna River water level in Sangli

Krishna River water level in Sangli

esakal

Updated on

सांगली : कोयना धरणात ९१ टीएमसी पाणीसाठा झाला आहे. धरण पाणलोट क्षेत्रातील पावसाचा जोर थोडा कमी झाला आहे. अगदी मध्यम स्वरूपाचा पाऊस कायम (Krishna River water level in Sangli today) आहे. त्यामुळे धरणातून विसर्ग कमी करण्यात आला आहे. तो आता ३३ हजारांवर नेण्यात आला आहे. काल दिवसभर कृष्णा नदीच्या पाणीपातळीत संथ वाढ सुरूच होती. सायंकाळपर्यंत पाणी ३० फुटांकडे सरकले होते.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com