Krishna river water diversion project for Solapur
esakal
सांगली/सोलापूर : कृष्णा नदीचे पाणी दुष्काळी भागाला देण्यासाठी एशियन बँकेच्या मदतीने १९ हजार कोटींची ‘कृष्णा फ्लड डायव्हर्शन’ योजना राबविली जाणार (Krishna river water diversion to Ujani Dam) आहे. या योजनेच्या सर्वेक्षणासाठी पाटबंधारे प्रकल्पाच्या अन्वेषण विभागाने आजपासून चार कामांची १६ कोटी ८१ लाख रुपयांची निविदा प्रक्रिया सुरू केली आहे. सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात सर्वेक्षणाची निविदा अंतिम केली जाणार आहे.