
सांगलीत रात्री उशिरापर्यंत स्थलांतर सुरू, १२५ कुटुंबातील ६१७ लोकांचे स्थलांतर
जामवाडी, सूर्यवंशी प्लॉट, कर्नाळ रस्ता, दत्तनगर, आरवाडे पार्कमध्ये शिरले पाणी
स्थलांतरितांसाठी ८ ठिकाणी व्यवस्था, मंगल कार्यालये घेतली ताब्यात
१२ प्रमुख मार्गांवर पाणी, वाहतूक बंद, नदीकाठच्या पर्यटन, रिल्स, फोटो शूटसाठी बंदी आदेश
Sangli Rain News : कृष्णा आणि वारणा नदीला पूर आला असून, नदीकाठचे जनजीवन विस्कळीत झाले आहे. नदीच्या पाणी पातळीत झपाट्याने वाढ होत असल्याने सांगली शहरासह जिल्ह्यातील नदीकाठच्या भागात धास्तीचे वातावरण निर्माण झाले आहे. कृष्णा नदीच्या पाणी पातळीत मध्यरात्री २ ते आज सायंकाळी सात या १७ तासांमध्ये तब्बल दहा फुटांची वाढ झाली. त्यामुळे सांगली शहराच्या जामवाडी, सूर्यवंशी प्लॉट, दत्तनगर, कर्नाळ रस्ता या भागात पाणी घुसले. दिवसभर झपाट्याने पाणी पातळी वाढत निघाल्याने या भागातून नागरिकांचे स्थलांतर करण्यात आले.