esakal |  कृष्णा रोकडे यांच्या विक्रमाची "इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड" नोंद

बोलून बातमी शोधा

Krishna Rokade recorded in the India Book of Records sangli education marathi news}

ग्रामीण भागातून एवढे मोठे यश मिळवणारे कृष्णा रोकडे हे एकमेव आहेत.  विक्रमाची नोंद इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड यांच्यामार्फत घेण्यात आली.

 कृष्णा रोकडे यांच्या विक्रमाची "इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड" नोंद
sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

नेर्ले (सांगली )  :  प्रा. कृष्णा रोकडे यांच्या नावाच्या विक्रमाची नोंद "इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड" मध्ये झाली आहे.टी ई टी सारख्या परीक्षांचा निकाल तीन ते पाच टक्के इतकाच लागत असताना प्रा.  कृष्णा रोकडे यांनी सलग नऊ वेळा ही पात्रता धारण करण्याचा विक्रम केला आहे. याबद्दल त्यांचे कौतुक होत आहे.

ग्रामीण भागातून एवढे मोठे यश मिळवणारे कृष्णा रोकडे हे एकमेव आहेत.  विक्रमाची नोंद इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड यांच्यामार्फत घेण्यात आली. स्वप्नस्फुर्ती खासगी क्लासेसच्या माध्यमातून रोकडे यांनी  टी.ई. टी.,सी.टी. ई. टी. आणि टेट मार्गदर्शन केंद्र इस्लामपूर येथे सुरू केले आहे.  शिक्षक पात्रता परीक्षा मध्ये सलग व सर्वाधिक वेळा पात्रता धारण करण्याच्या विक्रमाची नोंद  त्यांच्या नावावर आहे. त्यांचे विद्यार्थी ही पास झाले आहेत.

हेही वाचा- नियमाचे उल्लंघण करून अविश्वास मंजूर केल्यास जशास तसे उत्तर देऊ : महादेव जुगदर

शिक्षक पात्रता परीक्षा राज्य सरकार 2013 सालापासून तर केंद्र सरकार 2011 सालापासून घेत आहे. या परीक्षेमध्ये डी एड व बी एड विद्यार्थी लाखोच्या संख्येने परीक्षा देतात एकदा तरी पात्रता धारण करण्याचा प्रयत्न करतात. परंतु त्यांना या प्रयत्नांमध्ये क्वचितच यश मिळते. 

प्रा. कृष्णा रोकडे यांनी भावी शिक्षक होऊ पाहणाऱ्या सर्वच विद्यार्थ्यांपुढे एक आदर्श निर्माण केला आहे.परिस्थिती वर मात करीत त्यांनी यश मिळवले आहे. मनात जिद्द असेल व आपले प्रयत्न प्रामाणिक असतील तर यश मिळतेच व हे यश मिळवण्यासाठी आपल्या कार्यात सातत्य व आपला स्वतःवरती   आत्मविश्वास असणे अत्यंत गरजेचे आहे असे त्यांनी सांगितले.

संपादन- अर्चना बनगे