

Political activity intensifies across villages in the Kuchi Zilla Parishad group.
sakal
घाटनांद्रे : कवठेमहांकाळ तालुक्यातील कुची हे राजकीयदृष्ट्या अत्यंत महत्त्वाचे गाव समजले जाते. जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राजकीयदृष्ट्या गाव महत्त्वाचे ठरत आहे. या गण व गटातून निवडणूक लढवण्यासाठी इच्छुकांची गर्दी होत आहे. विशेषतः ग्रामविकास, रस्ते, पाणीपुरवठा, आरोग्य व शिक्षण या मुद्द्यांच्या आधारे इच्छुक उमेदवार निवडणुकीत सामोरे जात आहेत.