
इस्लामपूर : ‘‘देश आज अराजकाच्या उंबरठ्यावर आहे. भारत-पाकिस्तान फाळणीवेळी जेवढा धार्मिक विद्वेष नव्हता, त्याहून अधिक विद्वेष आज आहे. आजच्या समाजाची रचनाच विद्वेषावर उभारली जाते आहे. मध्यमवर्गीय आणि सामान्य लोक त्याला बळी पडत आहेत. हा वणवा रोखण्यासाठी विवेकाच्या साक्षरतेची आवश्यकता आहे,’’ असे प्रतिपादन माजी खासदार, ज्येष्ठ पत्रकार कुमार केतकर यांनी आज येथे केले.