Kuppwad Robbery Case
esakal
पश्चिम महाराष्ट्र
Kuppwad Robbery Case : 'मी दादा आहे, माझ्याविरुद्ध पोलिसांत तक्रार करशील तर एकेकाला गोळ्या घालीन'; कुपवाडच्या हॉटेलमध्ये प्रकार
Kuppwad Robbery Case - Key Incident Details : कुपवाडमध्ये ‘मी दादा आहे’ अशी धमकी देत हॉटेल गल्ल्यातून सहा हजारांची चोरी करण्यात आली. एपीआय आनंदराव घाडगे यांनी आरोपीविरुद्ध तत्काळ कारवाई करून तपास सुरू केला.
कुपवाड (सांगली) : ‘मी या ठिकाणचा दादा आहे. तुला माहीत नाही का? माझ्याविरुद्ध पोलिसांत (Kuppwad Crime News) तक्रार करशील तर एकेकाला गोळ्या घालीन,’ अशी धमकी देत जबरदस्तीने हॉटेलच्या गल्ल्यामधून सहा हजारांची रोकड लांबविणाऱ्या सराईतावर सहायक पोलिस निरीक्षक आनंदराव घाडगे यांनी कारवाईचा बडगा उगारला.
