Kupwad Case
esakal
कुपवाड (सांगली) : येथील संजय इंडस्ट्रीयल इस्टेटजवळील अष्टविनायक कॉलनी येथे गुन्हेगाराचा पाठलाग (Kupwad Case) करत चौघांनी कोयता, कुकरीने सपासप वार करत तरुणाचा खून केल्याची घटना घडली. राहुल सुनील कदम (वय २२, सध्या रा. अहिल्यानगर झोपडपट्टी, कुपवाड) असे त्याचे नाव आहे. काल भरदुपारी घडलेल्या घटनेने शहरात खळबळ उडाली.