

Sandalwood tree stumps seen inside the Kupwad Forest Department premises after the reported theft.
sakal
कुपवाड : कुपवाड वनविभागाच्या आवारातून पंधरा दिवसांपूर्वी रातोरात चार चंदनाची झाडे तोडून नेल्याची घटना अद्याप गूढच राहत आहे. चोख सुरक्षा व्यवस्था असूनही चोरटे अद्याप सापडलेले नाहीत, त्यामुळे वनविभागाच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे.