

Candidates campaigning intensely in Kupwad Ward No.1 ahead of the civic elections.
sakal
कुपवाड : भाजपविरुद्ध काँग्रेस-राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाची आघाडी यांच्यात काट्याच्या लढतीमुळे प्रभाग क्रमांक एककडे पूर्ण महापालिकेचे लक्ष लागले आहे. या प्रभागात भाजपकडून आग्रहाने उमेदवारी मागून घेतलेल्या सूर्यवंशी यांच्या नेटवर्कला आघाडीची बांधणी कशी टक्कर देते, हे पाहणे लक्षवेधी ठरणार आहे. येथे चारही गटांत थेट दुरंगी लढत होत आहे.