कोरोनाच्या धसक्‍याने कुपवाड हादरले 

PHOTO-2020-05-02-17-40-20.jpg
PHOTO-2020-05-02-17-40-20.jpg
Updated on

कुपवाड (सांगली: महापालिका क्षेत्रात विजयनगरनंतर आता कुपवाडमधील वाघमोडेनगर येथे कोरोनाचा रुग्ण आढळून आला आहे. महापालिका क्षेत्रातील दुसरा रुग्ण असल्याने कुपवाड शहर हादरले आहे. वाघमोडेनगरसह उपनगरासह ठीक-ठिकाणचे रस्ते सील केले असून औद्योगिक क्षेत्रामध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. 

कुपवाड परिसरासह बामणोली, काननवाडी या गावांनी कोरोना संसर्गाचा गंभीर धसका घेतला आहे. बाहेर गावाहून आलेला "कोरोना' बाधित रुग्ण परिसरातून वावरल्याने लोकांची घाबरगुंडी उडाली आहे. अंतर्गत रस्ते सील केले असले तरी औद्योगिक क्षेत्राचा भाग असल्याने कुपवाड परिसरातील वर्दळ सुरू आहे. शासनाच्या परवानगी नुसार सध्या कारखान्यात मोठ्या संख्येने कामगार कार्यरत आहेत. त्यांच्याही भितीचे वातावरण निर्माण झाला. औद्योगिक क्षेत्राजवळच वाघमोडेनगर भागात "कोरोना' पॉझिटिव्ह रुग्ण आढळल्याने ते घाबरलेल्या अवस्थेत असल्याचे उद्योजक सांगतात. 
महिनाभर लॉकडाउन मुळे त्यांची परिस्थिती बिकट स्वरूपाची बनली होती.

महिन्याभरानंतर हाताला काम मिळताच कोरोनाने शिरकाव केला. आता पुढे काय याची चिंता कामगार वर्गामध्ये आहे. अशा परिस्थितीत उद्योजकांनीही शासनाचा निर्णय मान्य केला आहे. मिळेल त्या सूचनेचे पालन करणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे. 


भागातील नागरिकांत सध्या भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. शहरासह उपनगर परिसरात ठीक-ठिकाणचे मार्ग सील करण्यात आले आहेत. आधीक दक्षते बाबत शनिवारी वाघमोडेनगर परिसरात जिल्हा अप्पर पोलिस अधीक्षका मनीषा डुबुले, महापालिका आयुक्त नितीन कापडणीस, उपधीक्षक संदीपसिह गील यांनी भेट दिली. आवश्‍यक खबरदारीसह कुपवाडकर नागरिकांना दक्षतेचे आवाहन करण्यात आले. 


कुपवडकरांनी खबरदारी बाळगावी 
"कोरोना' संसर्गाच्या पार्श्‍वभूमीवर कुपवाडमधील नागरिकांनी खबरदारी बाळगावी. औद्योगिक क्षेत्राकडे होणारी वाहतूक सुरूच आहे. सोशल डिस्टन्सचा काटेकोर पालक व्हावे. कोणाला ताप, सर्दीसह किरकोळ आजार जाणवल्यास त्यांनी तातडीने रुग्णालयात दाखवावे, असावाहनही करण्यात आले. 

 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com