esakal | कुपवाडला विनामास्क, सोशल डिस्टनसिंगचा बट्याबोळ 

बोलून बातमी शोधा

Kupwad without a mask, a baton of social distance}

'कोरोना' संसर्ग नियंत्रणाच्या पार्श्वभूमीवर कुपवाड परिसरात विनामस्क धारकांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. सोशल डिस्टन्सचा बट्याबोळ पाहायला मिळत असून गेल्या आठवड्याभरातील दंडात्मक कारवाईने एक लाखाचा टप्पा गाठला आहे. 

paschim-maharashtra
कुपवाडला विनामास्क, सोशल डिस्टनसिंगचा बट्याबोळ 
sakal_logo
By
ऋषीकेश माने

कुपवाड : 'कोरोना' संसर्ग नियंत्रणाच्या पार्श्वभूमीवर कुपवाड परिसरात विनामस्क धारकांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. सोशल डिस्टन्सचा बट्याबोळ पाहायला मिळत असून गेल्या आठवड्याभरातील दंडात्मक कारवाईने एक लाखाचा टप्पा गाठला आहे. 
'कोरोना' संसर्ग नियंत्रणाच्या दक्षतेसाठी प्रशासनाने दिलेल्या सुचनेनुसार कुपवाड महापालिका प्रशासनाने आठवडाभर दंडात्मक कारवाईचा जोर धरला आहे. प्रभाग समिती तीन परिक्षेत्रातील गर्दीची ठिकाणी झपाट्याने होणारी वाढ पाहता सोशल डिस्टनसिंगसह विनामास्क धारकांकडून महापालिका पथक दंडाची वसूली करीत आहे. कारवाई धुमधडाक्‍याची होऊनही कुपवाडात हलगर्जीपणाचे वातावरण कायम आहे. 

विविध व्यावसायिक,हॉटेल चालक,औद्योगिक कंपन्या,मंगल कार्यालये,खासगी क्‍लासेस,आठवडा बाजार यासह प्रत्येक चौकाममध्ये सायंकाळची गर्दी सध्या हलगर्जीपणाची ठरत आहे. आशा बेफिकीर धोरणा विरोधात दांडात्मक कारवाई करण्यासाठी आठवड्या भरापासून महापालिका पथकाने आपली कंबर कसली आहे. वेळेचे भान नराखता आरोग्य विभाग रात्री-अपरात्री पर्यत कारवाईसाठी सर्वेक्षण करतो. 

सहा.आयुक्त यांच्या उपस्थितीत दांडात्मक कारवाई केली जाते. आठवड्याभरात दंडाची वसुली नव्वद हजारावर गेली आहे. कुपवाड परिसरातील चित्र पाहता दंडाच्या वसुलीचा आकडा पुढे चौपट-पाचपट पुढे झपाट्याने वाढण्याची दाट शक्‍यता आहे. 

याबाबत सहा.आयुक्त दत्तात्रय गायकवाड म्हणाले, नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांकडून रविवार अखेर 84,700 इतका दंड वसूल करण्यात आला आहे. या कारवाईत विनामास्क धारकांसह, हॉटेल, मंगल कार्यालय,दुकानदार,मनोरंजन नगरी,केटरिंग चालक, औद्योगिक कंपन्या आशा विविध व्यवसायिकांकडून दंडाची आकारणी करण्यात आली. कारवाईसाठी सर्वेक्षण सुरू आहे. सदर कारवाईत आरोग्य निरीक्षक अनिल पाटील,अतुल आठवले,स्वच्छता निरीक्षक सिद्धांत ठोकळे,विकास कांबळे यांच्यासह कर्मचारी सहभागी होते. 

व्यसनाचे अड्डे दुर्लक्षित 
कुपवाड प्रभाग समिती तीन अंतर्गत प्रभागातील व्यसनांच्या अड्डयात वाढ झाली असून याठिकाणी अतिशय हलगर्जीपणा आढळतो. गुटखा,माव्यासह मद्याच्या ठेक्‍यावर जमणाऱ्या गर्दीत घट जाणवत नाही. आशा ठिकाणी सक्तीची कारवाई होणे गरजेचे आहे. 

मंगल कार्यालयाचे सर्वेक्षण 
महापालिका पथकाकडून सुरू असणाऱ्या कारवाईत मंगल कार्यालयाच्या सर्वेक्षणाची गरज आहे. कारवाई ही केवळ सोशल डिस्टनसिंग बाबत मर्यादित नठेवता अन्य बाबींची पडताळणी करण्याची गरज आहे. यामध्ये बांधकाम परवाना आणि वास्तविक केलेले बांधकामाचे मूल्यमापन, वातुकीची अडचण, पार्किंगच्या समस्यासेसह रेटलेल्या अतिक्रमणाची दखल घेणे महत्वाची आहे. 
 


संपादन : प्रफुल्ल सुतार