पंचनाम्यांकडे "आण्णासाहेबां'चे दुर्लक्ष ;  शासकीय विभागात समन्वयाचा अभाव

पंचनाम्यांकडे "आण्णासाहेबां'चे दुर्लक्ष ;  शासकीय विभागात समन्वयाचा अभाव
Updated on

सातारा : अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांसह सर्वसामान्य मेटाकुटीला आलेला असताना शासकीय स्तरावरून मात्र, याबाबत अनास्था आहे. कामबंद आंदोलनाचे कारण पुढे करून आण्णासाहेबांनी पंचनामे करण्याकडे दुर्लक्ष केले आहे. महसूल, कृषी, बांधकाम विभागातील समन्वयाच्या अभाव व एकमेकांवर कामे ढकलण्याच्या प्रवृत्तीमुळे नुकसानीच्या पंचनाम्यांची कामे अद्यापही पूर्ण झाली नाहीत. त्यामुळे नुकसानीची भरपाई मिळण्यासाठी आणखी वाट पाहवी लागणार आहे. 
जिल्ह्यात ऑगस्ट महिन्यात तब्बल दोन आठवडे अतिवृष्टी झाली. त्यामुळे धरणे ओव्हरप्लो होऊन नद्यांना पूर आला. शेकडो हेक्‍टरवरील पिके पाण्याखाली गेली. याचा फटका पाटण, कऱ्हाड, सातारा, जावळी, वाई, कोरेगाव तालुक्‍यांना बसला. शेतीचे प्रचंड नुकसान, तसेच मालमत्तेचीही कोट्यवधींची हानी झाली. पूर ओसरल्यानंतर नुकसानीचे पंचनामे शासकीय पातळीवरून सुरू झाले. त्यासाठी महसूल, कृषी, बांधकाम, महावितरण आदींनी नुकसानीचे पंचनामे सुरू केले; पण या पंचनाम्यांत विविध विभागांतील समन्वयाचा अभाव निर्माण झाल्याने पंचनाम्याचे काम रखडले आहे. महसूल, कृषी विभागाची सर्वाधिक जबाबदारी असताना महसूल विभाग सर्व काही कृषी विभागावर ढकलून बसला आहे. त्यातच ग्रामसेवकांनी कामबंद आंदोलनाचे निमित्त करत पंचनाम्यांकडे पाठ फिरविली आहे. 
कऱ्हाड, सातारा व कोरेगाव तालुक्‍यातील पंचनामे अद्याप अपूर्णच असल्याचे सांगण्यात येत आहे. कोट्यवधींचे नुकसानी झालेली असताना अधिकाऱ्यांना याचे सोयरेसुतक नसल्याचे जाणवत आहे. प्रशासकीय यंत्रणेत महसूल विभागप्रमुख असला, तरी त्यांचेच काही कर्मचारी व अधिकारी या पंचनाम्याच्या कामाबाबत चालढकल करत असल्याचे चित्र आहे, तर कृषी विभागावर सर्व काही ढकलून देऊन महसूलचे कर्मचारी आपल्या नेहमीच्या नसलेल्या कामात व्यस्त राहिले आहेत. त्यामुळे नुकसानी झालेल्यांची नेमकी चूक काय, असा प्रश्‍न आता यानिमित्ताने उपस्थित होत आहे. एकीकडे जिल्हाधिकाऱ्यांच्या नेतृत्वाखाली इतर अधिकारी नेटाने काम करत असल्याचे सांगितले जात आहे; पण प्रत्यक्षात तालुकास्तरापासून गावपातळीपर्यंतचे अधिकारी पंचनाम्याबाबत कानावर हात ठेवून बसले आहेत. पंचनाम्याचे आदेश देऊन दहा दिवस उलटले, तरी अद्याप ही 70 टक्के काम पूर्ण झाले आहे. उर्वरित पंचनाम्यांची कामे कधी पूर्ण होणार आणि नुकसानभरपाई कधी मिळणार हा महत्त्वाचा प्रश्‍न आहे. 

पंचनाम्यांना उशीर झाल्यास नुकसानभरपाई मिळणार? 
पंचनामे करण्यात दिरंगाई होत असल्याने अनेकांना नुकसान होऊनही भरपाईपासून वंचित राहण्याची भीती ग्रामीण भागातून व्यक्त होत आहे. पाऊस पूर्णत: बंद झाल्याने शेतातील पिकांत तुंबलेले पाणी कमी झाले आहे. मात्र, पिके पाण्यात राहिल्याने उत्पन्न घटणार आहे, तसेच अनेकांचे कृषीपंप पाण्याखाली गेल्याने ते नादुरुस्त आहेत. त्यांची दुरुस्ती करण्यापूर्वी पंचनामे होणे गरजेचे आहे; पण पंचनाम्यांची वाट न बघता दुरुस्ती करत आहेत, तसेच पिके वाचविण्यासाठीही शेतकऱ्यांची धडपड सुरू आहे. पंचनाम्यांना उशीर झाल्यास या पिकांचे नुकसान दिसणार नाही, त्यामुळे नुकसान होऊन भरपाई मिळू शकणार नाही. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Miraj Government Hospital Accident
Sangli Ganesh Visarjan
Who is Yuvraj Adityaraje Patwardhan?
Vasumbe Road Accident Father And Son Killed In Two Wheeler Crash Mother Seriously Injured After Tempo Collision
Marathi News Esakal
www.esakal.com