नवेखेड : महिला व बालविकास विभागातर्फे महिलांसाठी दरमहा १ हजार ५०० रुपये देणारी लाडकी बहीण योजना राबविली जात आहे. या योजनेतील लाभार्थी महिलांची नागरी सहकारी पतसंस्था (Women Cooperative Society) स्थापन करण्यासाठीचे सहकार आयुक्त दीपक तावरे यांनी आदेश दिले आहेत. सांगली जिल्ह्यात रक्षाबंधनापूर्वी (९ ऑगस्ट) लाडक्या बहिणींची (Ladki Bahin Yojana) नागरी सहकारी पतसंस्था स्थापन करण्यासाठी जिल्ह्यातील सहकार विभागाने नियोजन केले आहे.