जुळे सोलापुरात "यांनी' लावले खड्ड्यात दिवे!

जुळे सोलापुरात "यांनी' लावले खड्ड्यात दिवे!
Updated on

सोलापूर, ता. 11 : जुळे सोलापुरात जाणाऱ्या आसरा चौकातील पुलावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले आहेत. याकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांनी खड्ड्यात दिवे लावून आगळेवेगळे आंदोलन केले. अपघात टाळण्यासाठी महापालिका अधिकारी आणि लोकप्रतिनिधींच्या डोक्‍यात प्रकाश पडायला हवा अशी मागणी यावेळी करण्यात आली. 

संभाजी ब्रिगेडचे शहराध्यक्ष श्‍याम कदम यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले. जुळे सोलापुरात अनेक ठिकाणी रस्ते खड्डेमय झाल्यामुळे अपघातांचे प्रमाण वाढले आहे. महानगरपालिका प्रशासन खड्डे बूजविण्याबाबत उदासीन असल्याचे दिसून येत आहे. होटगी रस्त्यावरून जुळे सोलापुरात जाण्यास आणि जुळे सोलापुरातून शहरात येण्यास आसरा चौकातील रेल्वे पुलाचा वापर होतो. या पुलावर नेहमीच वाहनांची वर्दळ असते. पुलावरील रस्ता खराब झाला असून जागोजागी खड्डे पडले आहेत. त्यामुळे अपघातांचे प्रमाण वाढलेले आहे. हा पूल अरुंद असून रेल्वे प्रशासन व महानगरपालिका प्रशासनाने रस्ता रुंदीकरण करावा अशी मागणीही संभाजी ब्रिगेडच्या वतीने करण्यात आली आहे. 

यावेळी संभाजी ब्रिगेडचे संजय भोसले, गोविंद चव्हाण, विनोद राठोड, अरविंद शेळके, संतोष माशाळ, अविनाश फडतरे, ओंकार कदम, मयुर बंगरगी, महेश हिरेमठ, चेतन चौधरी, सोमनाथ पात्रे, स्वप्निल गायकवाड, राजू चव्हाण, अमरनाथ मोळकेळी, विश्वनाथ अमाने, गौरीशंकर वरपे, नवनाथ देडे, राम चव्हाण, अर्जुन पुणेकर, अजय लोखंडे, मल्लिनाथ शेवगार, अमोल भोसले, कपिल आलाट, रोहित चव्हाण आदी उपस्थित होते. 
-- 
संभाजी ब्रिगेडने यापूर्वी खड्ड्यामध्ये झाडे लावून महापालिका प्रशासनाचा निषेध केला होता, त्यानंतर खड्ड्यात मुरूम टाकून तात्पुरती डागडुजी करण्यात आली होती. आता आम्ही खड्डे दिवे लावल्याचे आंदोलन केले आहे. हा रस्ता दुरुस्त केला नाहीतर आसरा पुलावर रस्ता रोको आंदोलन करण्यात येईल. 
- शाम कदम, 
शहराध्यक्ष, संभाजी ब्रिगेड

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Guhagar Vijapur highway latest update
Shaktipeeth Highway Protes
Sangram Jagtap statement on Kesarekar murder
Tukaram Mundhe effect on Food and Drug Administration action
Marathi News Esakal
www.esakal.com