गाेडवली- पाचगणीत जमीन खचण्याचा धाेका

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 3 ऑगस्ट 2019

 गेली 10 वर्षापूर्वीही या ठिकानी असाच प्रकार घडला होता पुन्हा एकदा अशी घटना घडल्याने शेजारीच असणाऱ्या पुरातन तपणेश्वर मंदिराला धोका पोहोचू शकतो त्यामुळे यावर उपाययोजना होणे आवश्यक आहे. 
 

भिलार : महाबळेश्वर तालुक्यात गेली आठ दिवसांपासून सुरू असणार्‍या धुवाधार पावसामुळे पाचगणी या गिरी शहरानजीकच्या गोडवली ,(ता.महाबळेश्वर) या गावातील तपनेश्वर मंदिरा लगत असणारी शेत जमिन मोठ्या प्रमाणात खचली असून मोठमोठ्या भेगा पडल्या आहेत. त्यामुळे ग्रामस्थांमध्ये घबराटीचे वातावरण पसरले आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की गोडवली हे पांचगणी शहरा नजीक टेबल लँडच्या कुशीत वसलेले आहे. गेली 10 वर्षा पुर्वी याच ठिकाणी जमीन खचण्याचा प्रकार घडला होता. त्यावर उपाययोजना करण्यात जिल्हा प्रशासनाला अपयश आले आहे. जमिनीला भेगा पडून ती खचत असल्याने मोठ्या प्रमाणात शेतकर्‍याचे नुकसान झाले आहे. राहिलेली शेतीही भूस्खलनात जाते की काय, अशी भीती या जमीन मालकामध्ये निर्माण झाली आहे. या वर्षीही गेल्या आठ दिवसांपासून पडणार्‍या जोरदार पावसामुळे शेतजमीन खचू लागली आहे. बटाटे लावलेल्या या शेतात मधोमध भेगा पडून ती खचत आहे.जमिनीला भेगा पडून मोठ्या प्रमाणावर माती वाहून जात असून शेतजमिनीत तडे जात आहेत. गेल्या 10 वर्षा पुर्वी याच ठिकाणी जमीन खचली होती. त्यावेळी  अधिकार्‍यांनी पाहणी केली होती.परंतु जमिन खचण्याच्या प्रकाराची भौैगोलिक तज्ज्ञांकडून पाहणी करायला हवी होती. मात्र, अद्याप यावर कोणतीच उपाययोजना करण्यात आलेली नाही.  मुसळधार पावसामुळे पुन्हा एकदा ही जमीन खचू लागली आहे. शेतीमध्ये सुमारे 100 फूट लांबीची व पाच ते सहा फूट उंचीची भेग पडली असून जमीन खचत असल्याने ऐन खरिपाच्या हंगामात लागवड केलेल्या बटाटा शेतीचे नुकसान होत आहे. त्यामुळे ही शेतजमीन नष्ट होण्याची भीती आहे.
गोडावलीतील विलास गंगाराम गुरव, उमेश गंगाराम गुरव,शंकर कृष्णा गुरव,सतिश रघुनाथ गुरव या शेतकऱ्यांचे शेतीचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे.
दरम्यान महसूल विभागाने या घटनेचा पंचनामा केला आहे. 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Landslide may in Godvali