
संधीचा लाभ घ्यावा
जन्मनोंदीची नोंद पालिकेच्या रजिस्टरमध्ये नसल्यास जन्म व मृत्यू विभागाकडून अनुलब्धता प्रमाणपत्र घेऊन जन्म व मृत्यू नोंदणी अधिनियम 1969 चे कलम व महाराष्ट्र जन्म-मृत्यू नोंदणी अधिनियम 2000 नियम 10 नुसार न्यायालयीन प्रक्रियेद्वारे दाखले मिळवता येतील. तसेच या शेवटच्या संधीचा लाभ घ्यावा.
- डॅा. संतोष नवले, आरोग्याधिकारी
सोलापूर महापालिका
सोलापूर : सन 1969 पूर्वी अथवा नंतर नावाशिवाय केवळ जन्माची नोंद झालेल्या नागरिकांना आपल्या जन्माची नोंद करून दाखला मिळवण्याची अखेरची संधी उपलब्ध झाली आहे. याबाबतचा अध्यादेश जारी करण्यात आला आहे. 14 मे 2020 नंतर वंचित राहिलेल्यांना जन्मनोंदणी करता येणार नाही, अशा सूचना राज्याच्या आरोग्य सेवा उपसंचालकांनी राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या जन्म-मृत्यू नोंद विभाग निबंधक व उपनिबंधकांना दिले आहेत.
जन्मदाखल्याची गरज लागतेच
शाळा-महाविद्यालयात प्रवेश असो की नोकरी; तसेच आयुष्यातील अनेक बाबींसाठी अथवा परदेशगमनासाठी जन्मदाखला आवश्यक ठरतो. पूर्वीच्या तुलनेत सद्यस्थितीत आपल्या कुटुंबातील सदस्यांच्या जन्मदाखल्यांसाठी सर्वच आग्रही असतात. 1969 पूर्वी अथवा नंतर नावाशिवाय केवळ जन्माची नोंद झालेल्या नागरिकांना आपल्या जन्माची नोंद करून दाखला मिळवण्याची अखेरची संधी उपलब्ध झाली आहे.
14 मे 2020 डेडलाईन
ज्या नागरिकांची जन्माची नोंदणी 1 जानेवारी 2000 पूर्वी झालेली आहे, ज्यांच्या नोंदणीला 15 वर्षांचा कालावधी पूर्ण झाला आहे, अशा सर्व नागरिकांना जन्मनोंदणीची संधी मिळणार आहे. किंबहुना 1969 पूर्वी नोंदणी केलेल्या व्यक्ती अथवा त्यांच्या पालकांनादेखील जन्मनोंद करता येणार असून ही मुदत केवळ 14 मे 2020 पर्यंतच उपलब्ध असेल. त्यानंतर हा कालावधी कुठल्याही परिस्थितीत वाढवून मिळणार नाही, अशी सूचना देण्यात आली आहे.
हे द्यावे लागतील पुरावे
नागरिकांना नावाच्या खात्रीसाठी शाळा सोडल्याचा दाखला, शैक्षणिक प्रमाणपत्र, पासपोर्ट, पॅनकार्ड, आधारकार्ड यापैकी एका पुराव्यासह जन्म व मृत्यू नोंदणी कार्यालयात अर्ज करावा लागणार आहे. महाराष्ट्र