अग्रणी नदीचे पुनरुज्जीवन दुष्काळी भागाला दिशादर्शक 

Leading river revival is a guide to drought areas
Leading river revival is a guide to drought areas

आळसंद : आठ वर्षांपूर्वी लोकसहभागातून अग्रणी नदीचे पुनरुज्जीवन झाले ते राज्यातील दुष्काळी भागाला भागाला दिशादर्शक झाले, असे प्रतिपादन परिविक्षाधीन जिल्हाधिकारी आयुषी सिंग यांनी केले. खानापूर तालुक्‍याच्या घाटमाथ्यावरील अग्रणीनदी पुनरुज्जीवन करण्यात आले आहे. त्यांचा अभ्यास पाहणी करण्यासाठी आले असता सिंग यांनी ग्रामस्थांशी संवाद साधला. 

सिंग म्हणाल्या,""गेली अनेक वर्षांपासून लुप्त झालेली अग्रणीनदीचे पुनरुज्जीवन झाले आहे. लोकांचा सहभाग, सामाजिक संस्थेचे सहकार्य, प्रशासनाची मदत अशा त्रिवेणी संगमातून अग्रणीचे पुनरुज्जीवन होण्यास मदत झाली आहे. कोणतेही काम यशस्वी होण्यासाठी लोकांचा सहभाग महत्त्वाचा आहे. तो सहभाग अग्रणीच्या कामात प्राधान्याने दिसून येतो. 

उगमा जवळील अगस्ती ऋषींचे मंदिर, जाधववाडी पूल, बलवडी येथील गायकवाड मळा येथील लोकसहभागातून झालेला बंधारा, बेणापूर येथील पाटबंधारे विभागाचा बंधारा, सुलतानगादे पूल तेथील कृषीविभागाचा बंधारा व अग्रणीमुळे शेती पिकात बदल कसा होत गेला, जमिनीतील पाणी पातळी वाढल्याने विहीर व बोअरचे पाणी वाढले याची माहिती सिंग यांनी घेतली.'' यावेळी तहसीलदार ऋषिकेत शेळके, निवासी तहसीलदार प्रतीक्षा भुते, तानाजी पाटील, जलसंधारण विभागाचे अधिकारी श्री. गोसावी, पाटबंधारे अभियंता डी. डी. कांबळे, मंडल अधिकारी एस. डी. साळुंखे, तलाठी वैशाली वाघमोडे, विशाल कदम यांच्यासह शेतकरी उपस्थित होते.


संपादन : प्रफुल्ल सुतार 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com